Join us

आदिमानवच्या रुपात अंधेरी स्टेशनबाहेर फिरताना दिसला 'हा' अभिनेता, ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:57 IST

अनेकांनी अक्षय कुमार उत्तर दिलं दिलं जे चुकीचं आहे, तुम्हाला ओळखता येतंय का?

अनेक कलाकार सिनेमातील भूमिकेसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांच्या लूक्समध्येही बदल करत असतात. अनेकदा त्यांचा बदललेला लूक पाहून त्यांना ओळखणंही कठीण होतं. असाच एक अभिनेता काही दिवसांपूर्वीच आदिमानवाच्या रुपात अंधेरी स्टेशनवर दिसला. त्याला पाहून कोणीही ओळखू शकत नाही की हा बॉलिवूडमधील सर्वात आघाडीचा अभिनेता आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तुम्ही ओळखलंत का?

लांब केस, वाढलेली दाढी, विचित्र अवतार, पायात जाड बूट,आदिमानवासारखा वेष धारण करुन हा अभिनेता मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसला. त्याच्या कमरेला चाकूही अडकवलेला दिसत आहे. अंधेरी स्टेशनबाहेर तो वणवण फिकतोय, कधी एखाद्या खाण्याच्या गाडीवर पिशव्या उचलतोय तर कुठे हातगाडी ढकलताना दिसतोय. त्याला पाहून कोणालाही भीती वाटेल असा त्याचा लूक आहे. 

नाही ना ओळखलं? हा अभिनेता आहे आमिर खान (Aamir Khan). होय, काही दिवसांपूर्वीच आमिर खानचा आदिमानवाचा लूक करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आमिरनेच तो शेअरही केला होता. यात तो प्रोस्थेटिक मेकअप करताना दिसत आहे. त्याचं रंगरुपच पूर्ण पालटलं आहे. 

आमिरने हा लूक नक्की कोणत्या सिनेमासाठी केला हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्याचा 'सितारे जमीन पर' सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे. तसंच 'लाहोर १९४७' या सिनेमाची तो निर्मिती करत आहे. यामध्ये सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :आमिर खानसोशल मीडियाबॉलिवूड