Join us

आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीच्या सुरक्षेची केली व्यवस्था; म्हणाला, "मी तिला आधीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 17:26 IST

आमिर खानने काल पापाराझींसोबत प्री बर्थडे साजरा केला. यावेळी त्याने सर्वांना गौरीची ओळख करुन दिली.

'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. यासोबतच तो तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याची कबुली त्याने दिली आहे. १४ वर्ष लहान बंगळुरुच्या गौरी स्प्रॅटला (Gauri Spratt)  तो दीड वर्षांपासून डेट करतोय. विशेष म्हणजे दोघंही एकमेकांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतात. आमिर खानचा याआधी दोन वेळा घटस्फोट झाला आहे. आता त्याच्या आयुष्यात नवीन प्रेम आलं आहे. कालच त्याने गौरीची ओळख माध्यमांसमोरही करुन दिली. यानंतर सगळीकडे फक्त गौरी स्प्रॅटचीच चर्चा होती. आमिरला हा अंदाज होताच म्हणून त्याने आधीच गर्लफ्रेंडसाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवला आहे.

आमिर खानने काल पापाराझींसोबत प्री बर्थडे साजरा केला. यावेळी त्याने सर्वांना गौरीची ओळख करुन दिली. तसंच तो तिच्याविषयी भरभरुन बोलला. आताच तिच्याबद्दल सोशल मीडियावर रिव्हील करु नका अशी विनंती त्याने केली होती. मात्र पाहता पाहता ही बातमी आणि गौरीविषयीची माहिती, फोटो सगळीकडे पसरले. आमिर म्हणाला, "मी दीड वर्षांपासून गौरीसोबत आहे. मला आता सेटल झाल्यासारखं वाटतंय. या वर्षात मी तिला स्पॉटलाईटसाठीही तयार केलं. मी तिला जगासमोर आणल्यानंतर ती आपोआपच या प्रसिद्धीचा भाग होणार हे मला माहित होतं. मी याविषयी तिला सगळं सांगितलं होतं. काही गोष्टींसाठी मी तिची तयारी करुन घेतली आहे. तिला या सगळ्याची सवय नाहीए."

गौरीसाठी बॉडीगार्ड ठेवणार का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, "मी गौरीची सर्वांशी ओळख करुन देण्याआधीच तिच्यासाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवला आहे. हा पण हे मी फक्त माझ्या समाधानासाठी केलं आहे."

टॅग्स :आमिर खानरिलेशनशिपबॉलिवूडसेलिब्रिटी