Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी गिरच्या जंगलात पोहोचला आमिर खान

By गीतांजली | Updated: December 29, 2020 11:26 IST

खान कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आमिर खान आणि किरण राव यांचा  28 डिसेंबर (काल) लग्नाचा 15वा वाढदिवस साजरा केला. 28 डिसेंबर 2005मध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकले होते.  या खास दिवसासाठी आमिर दोन दिवसांपूर्वी आपल्या परिवारासह गिर राष्ट्रीय उद्यानात पोहोचला आहे. आमिरसह मुलगा आझाद, पुतणा इम्रान खान, भाची इमारा खानसुद्धा आहेत. खान कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

किरण राव आमिर खानची दुसरी पत्नी आहे. आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता आहे. आमिर आणि रिनाचे २००२ मध्ये घटस्फोट झाले. रिना आणि आमिरला दोन मुलं इरा आणि जुनैद आहेत. आमिर आणि किरण रावच्या मुलाचे नाव आझाद राव खान आहे. आमिरने मुलाखतीत सांगितले- “लगान या चित्रपटाच्या दरम्यान तो किरणला भेटला होता.” त्यावेळी किरण माझ्या टीमची फक्त एक सदस्य होती.

आमिरने सांगितले होते की, एक दिवस किरणचा फोन आला आणि 30 मिनिटं तिच्याशी बोलला. त्या फोन कॉलनंतर मी किरणला डेट करण्यास सुरुवात केली. आम्ही एकमेकांना १-२ वर्षे डेट करत होतो. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आमिर खान 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम्पपासून प्रेरीत होऊन बनवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. . 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' यानंतर आमिर गुलश कुमार यांचा बायोपिक मुगलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सुरुवातीला जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा अभिनेता अक्षय कुमार 'मुगल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होता. नंतर हा चित्रपट आमिर खानकडे आला. 

टॅग्स :आमिर खान