Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर जाणार सुटीवर

By admin | Updated: October 28, 2014 00:21 IST

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या बहुचर्चित शोचे लवकरच दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारण केले जाणार आहे.

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या बहुचर्चित शोचे लवकरच दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारण केले जाणार आहे. त्यानंतर आपण काही दिवसांसाठी सुटीवर जाणार असल्याचे आमिरचे म्हणणो आहे. ‘सत्यमेव जयते’मुळे गेल्या काही दिवसांत मी कमालीचा व्यस्त आहे, त्यामुळे स्वत:बद्दल विचार करण्यास वेळच मिळत नसल्याची खंत त्याने बोलून दाखवली. चालू वर्षी ‘पीके’च्या शूटिंगसाठी दिलेल्या 15 दिवसांचा अपवाद वगळता मी ‘सत्यमेव जयते’मध्येच व्यस्त होतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला मानवाची चांगला आणि वाईट अशी दोन रूपे पाहायला मिळाली, असेही त्याने स्पष्ट केले. पैसा कमावणो हे माङो कधीच उद्दिष्ट राहिले नाही. ‘सत्यमेव जयते’ला मिळालेला प्रतिसाद माङयासाठी बहुमोलाचा असल्याचेही आमिर म्हणाला.