Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील यशच्या खऱ्या आयुष्यातील गौरीला पाहिलंत का? ती देखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 07:00 IST

फार कमी लोकांना माहित आहे की यश उर्फ अभिषेक देशमुखचे लग्न झाले असून त्याची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

आई कुठे काय करते मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील अनिरूद्ध, अरुंधती, यश, आप्पा, आजी, अभि, ईशा या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारतो आहे. यापूर्वी अभिषेकने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की अभिषेक देशमुखचे लग्न झाले असून त्याची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

अभिषेक देशमुखच्या पत्नीचे नाव आहे कृतिका देव. अभिषेक आणि कृतिका ६ जानेवारी, २०१८मध्ये लग्न केले. कृतिकाने राजवाडे अँड सन्स या चित्रपटात काम केले होते.

तसेच हॅपी जर्नी या चित्रपटात तिने काम केले. तसेच प्रथमेश परब सोबत तिने प्रेम दे या सीरिजमध्ये देखील काम केले होते. ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे.

अभिनेता अभिषेक देशमुखने या मालिकेआधी पसंत आहे मुलगी या मालिकेत काम केले होते. यात त्याने साकारलेली पुनर्वसूची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

याशिवाय तो होम स्वीट होम या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. याशिवाय १५ ऑगस्टमध्येही त्याने काम केले आहे. या व्यतिरिक्त अभिषेकने वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका