Join us

अरुंधतीचं 'अनुपमा'ला सरप्राईज! दोन्ही मालिकांचं शूट एकाच सेटवर; अभिनेत्रींनी घेतली गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:25 IST

दोन्ही अभिनेत्रींच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

टेलिव्हिजन दोन मालिकांचा सुरुवातीपासूनच बोलबोला आहे. त्या म्हणजे मराठीतील 'आई कुठे काय करते' णि हिंदीतील 'अनुपमा'. दोन्ही मालिकांनी टीआरपी शर्यतीत कित्येक आठवडे पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. नुकतंच दोन्ही मालिकांचं शूट एकाच सेटवर सुरु होतं. तेव्हा अनुपमा आणि अरुंधती यांची भेट झाली. त्यांच्यातील मैत्रीचा बाँड अतिशय घट्ट असल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभूलकर (Madhurani Prabhulkar) दोघींनी मालिकेच्या सेटवर गळाभेट घेतली. दोन्ही मालिकांचं शूट एकाच सेटवर सुरु होतं. तेव्हा आधी मिलिंद गवळी रुपालीशी गप्पा मारत होते. मागून मधुराणी आली आणि तिने रुपालीला सरप्राईज दिलं. दोघींनी एकमेकींची विचारपूसही केली. यावेळी रुपाली अगदी स्पष्ट मराठीत बोलताना दिसली. 'मला उभंही राहता येत नव्हतं एवढं बरं नाहीए. चक्कर येत होती. पण आता तुम्हाला भेटून एकदम छान वाटलं' असं ती म्हणाली. दोघींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'आई कुठे काय करते' २०१९ पासून सुरु आहे. मालिकेला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. तर 'अनुपमा' २०२० पासून सुरु आहे. सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेचा टीआरपी घसरला आहे. मालिका बंद करा अशीही मागणी जोर धरुन आहे. मालिकेची संध्याकाळची वेळ रद्द करत आता मालिका दुपारच्या वेळी प्रसारित करण्यात आहे.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासोशल मीडिया