Join us

"आमच्या रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात...", अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावरुन मराठी अभिनेत्रीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 13:26 IST

एकीकडे अंबानींच्या लेकाचा वेडिंग सोहळा होत असताना दुसरीकडे मात्र अंबानींच्या जिओ कंपनीने मोबाईलच्या रिचार्जमध्ये वाढ केली. त्यावरुन सोशल मीडियावर तुफान मीम्सही व्हायरल झाले होते. आता मराठी अभिनेत्रीने मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. 

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. या ग्रँड वेडिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकीकडे अंबानींच्या लेकाचा वेडिंग सोहळा होत असताना दुसरीकडे मात्र अंबानींच्या जिओ कंपनीने मोबाईलच्या रिचार्जमध्ये वाढ केली. त्यावरुन सोशल मीडियावर तुफान मीम्सही व्हायरल झाले होते. आता मराठी अभिनेत्रीने मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. 

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका बाजूला जस्टिन बीबरचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला मुकेश अंबानींचा फोटो दिसत आहे. "माझ्या २९ रुपयांच्या रिचार्जचे पैसे जस्टिन बीबरच्या खिशात जाताना...", असं तिने व्हिडिओत म्हटलं आहे. "जर तुम्हाला अजून याची जाणीव झाली नसेल तर", असं कॅप्शन गौरीने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 

नुकतंच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला कलाविश्वातील सिनेतारकांनीही हजेरी लावली होती. तर हॉलिवूड गायक जस्टिन बिबरने त्याच्या परफॉर्मन्सने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. अंबानींच्या वेडिंग सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी त्याने जवळपास १० मिलियन डॉलर रुपयांचं मानधन घेतल्याची चर्चा आहे. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा अनंत अंबानी हा धाकटा लेक आहे. अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याचीदेखील बरीच चर्चा रंगली होती. आता १२ जुलैला  ते लग्नबंधनात अडकणार आहेत. तर १३ जुलैला त्यांचा आशीर्वाद सेरेमनी आणि १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शन असणार आहे.  

टॅग्स :अनंत अंबानीआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमुकेश अंबानी