Join us  

"७६ वर्षांच्या आजींना Ramp Walk करताना बघून...", अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:32 AM

मिलिंद गवळी यांनी नुकतीच एका सौंदर्यस्पर्धेसाठी हजेरी लावली होती. त्यांनी याबाबत एक पोस्ट लिहिली आहे.

'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मिलिंद गवळी वैयक्तिक आयुष्यातील आणि करिअरचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट हा कायमच चर्चेचा विषय असतो. आतादेखील मिलिंद गवळींनी सौंदर्याच्या व्याख्येवर सविस्तर पोस्टही लिहिली आहे. मिलिंद गवळी यांनी नुकतीच एका सौंदर्यस्पर्धेसाठी हजेरी लावली होती. 

मिलिंद गवळींची पोस्ट

Beauty lies in the eyes of the beholder

माझ्यामते जन्मताच सगळेच सुंदर असतात. म्हणून बघा ना आपल्याला कुठलंही लहान बाळ आवडतंच. लहान बाळाला बघितलं की आपल्या मनामध्ये खूप करुणा, प्रेम आणि आनंद येतोच येतो. पण जसजशी मुलं मोठी होत जातात तसतशी आजूबाजूच्या लोकांमुळे किंवा घरातल्या माणसांमुळे प्रत्येकाचा आपला स्वतःचा एक स्वत:बद्दलचा दृष्टिकोन तयार होत जातो. शाळेमध्येच आपल्याला “ही किती सुंदर आहे किंवा तो किती हँडसम आहे"...पण वर्गातला प्रत्येक मुलगा हँडसम आणि प्रत्येक मुलगी सुंदर आहे, असं कोणीच का म्हणत नाही ? आपल्या घरात सुद्धा नातेवाईकांमध्ये “हिची मुलगी छान आणि तिच्यापेक्षा हिचा रंग गोरा”, “हिचं नाकच सरळ तिचं नाक नक्ट"... 

अनेक सुंदर मुली पाहिल्या आहेत, ज्यांना बाकीचे लोकं कधीच सुंदर म्हणत नव्हते...पण त्यांना स्वत:मनापासून वाटत होतं की त्या खूप सुंदर आहेत. आणि खरं सांगू ज्या दिवशी आपल्याला स्वतःला मनातून वाटतं की आपण सुंदर आहोत तेव्हा आपण खरंच सुंदर होतो.

that is self belief, they believe they are beautiful define beauty असं जर आपण विचारलं तर अनेकांच्या सौंदर्याच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या आहेत. म्हणजे बघा काही देशांमध्ये एक अतिशय अप्सरा म्हणून मानली जाणारी, दुसऱ्या देशामध्ये अगदी सामान्य दिसणारी आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रत्येकाचा सौंदर्याकडे बघायचा एक आपला वेगळाच दृष्टीकोण असतो. 

आता परवा मनाली यांनी organise केलेल्या Seabuzzz 2024 beauty pageant साठी मला रेशमा रामपूर आणि सविता मालपेकर यांनी आमंत्रित केलं होतं . अतिशय सुंदर पद्धतीने R city Mall, Ghatkopar मध्ये organise केला होता. तिथे तीन विभाग होते Miss, Mrs आणि Golden pageant...अगदी सोळा वर्षापासून ते 76 वर्षापर्यंत participate केलं होतं. त्या 76 वर्षाच्या बाईंना ramp walk करताना बघून मला खरंच खूप छान वाटलं. आपण सुंदर आहोत हे self belief त्यांच्यामध्ये दिसत होतं. तसंच self belief त्यात एका १६ वर्षाच्या मुलीमध्ये सुद्धा होतं आणि या सगळ्या 30 participants मध्ये self belief असल्याशिवाय त्या stage वर आल्या नाहीत. प्रत्येकाने आपल्या अंतरमनाला सांगितलंच असणार, मनात बिंबवलंच असणार की “मी सुंदर आहे”. so lets start believing in ourselves .

मिलिंद गवळींची ही पोस्ट चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमिलिंद गवळीमराठी अभिनेता