Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री आहे शाहरुख खानची जबरा फॅन, फोटो शेअर करत लिहिली ही पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:33 IST

नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून ती फॅन्सच्या संपर्कात असते.

लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती. प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती. अहाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अहाना नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.

अहानाने नुकताच बेताल या वेबसिरीजचे शूटिंग पूर्ण केले आहे. या वेबसिरीजची निर्मिती शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे.

ही वेबसिरीज अहानासाठी खास आहे कारण ती स्वत: एसआरकेची मोठी फॅन आहे. एसआरके द्वारा निर्मित  वेबसिरीजचा भाग होणे म्हणजे अहाना तिचे एक स्वपन पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.  

फ्रेंडशिप डेच्या दिवशी बेतालच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता त्याच दिवशी तिला शारुखन खान देखील भेटला. अहानाने तिचा हा फॅन गर्ल मोमेंट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि याला एक कॅप्शन सुद्धा दिेले आहे. अहानाने लिहीले आहे की, "प्यार दोस्ती है... कुछ कुछ होता है ... एसआरके तू समजू शकणार नाही' असे कॅप्शन तिने दिले आहे.

टॅग्स :अहाना कुमराशाहरुख खान