Join us
Daily Top 2Weekly Top 5

या दोन भाज्यांचा आहारात समावेश केल्याने ८८ वर्षांचे धर्मेंद्र आहेत फिट अँड फाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:25 IST

धर्मेंद्र यांच्या फिटनेसचं सीक्रेट नेमकं काय आहे? जाणून घ्या (dharmendra)

धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. धर्मेंद्र यांचे सिनेमे मनोरंजन विश्वात आजही तितकेच आवडीने पाहिले जातात. धर्मेंद्र हे ८८ वर्षांचे आहेत. तरीही या वयातली त्यांची एनर्जी आणि उत्साह वाखाणण्यासारखा आहे. अनेकांना धर्मेंद्र यांची सळसळती ऊर्जा पाहून प्रेरणा मिळते. धर्मेंद्र इतके फिट कसे? धर्मेंद्र यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश आहे? धर्मेंद्र यांचं दैनंदिन रुटीन काय असतं?  याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

धर्मेंद्र यांच्या आहारात या पदार्थांचा समावेश

धर्मेंद्र या वयात फिट राहण्यासाठी काजू, बदाम किंवा इतर कोणतंही ड्रायफ्रूट खात नाहीत. धर्मेंद्र यांच्या आहारात दूधीच्या भाजीचा प्रामुख्याने समावेश असतो. याशिवाय ढेमसेची भाजीचा समावेश असतो. ढेमसेला हिंदीत टिंडे असं म्हणतात. या दोन हिरव्यागार भाज्या खाऊन धर्मेंद्र फिट अँड फाईन आहेत. धर्मेंद्र यांचा लेक सनी देओलने वडिलांच्या या आहाराचा उल्लेख एका मुलाखतीत केला होता.

धर्मेंद्र यांचा दैनंदिन दिनक्रम कसा असतो?

धर्मेंद्र आता वयोमानानुसार जीम वगैरे करु शकत नाहीत. तरीही रोज ३० मिनिटं ते जिममधील सायकल चालवतात. याशिवाय जीरो शुगर डाएट करुन धर्मेंद्र यांच्या आहारात साखरेचे कोणतेही पदार्थ आढळून येत नाहीत. याशिवाय जमेल तसं धर्मेंद्र त्यांच्या फार्म हाऊसमध्ये शेती करतात, ट्रॅक्टर चालावतात, विहिरीतून पाणी काढतात. त्यामुळे आपसूक धर्मेंद्र यांची शारीरिक हालचाल होते. आणि नकळतपणे फिट अँड फाईन राहण्यासाठी त्यांचा व्यायामही होतो.

टॅग्स :धमेंद्रफिटनेस टिप्स