Join us

सैराटमधील ८ फेमस डायलॉग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 08:19 IST

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश-परदेशातील प्रेक्षकांच्या मनावरही गारूड केलं आहे. या चित्रपटातील असेच काही फेमस डायलॉग तुमच्यासाठी

मीनाक्षी कुलकर्णी, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश-परदेशातील प्रेक्षकांच्या मनावरही गारूड केलं आहे. या चित्रपटातील आर्ची-परश्याचा अभिनय, त्यांची मित्र-मंडळी, गाणी यासह चित्रपटातील डायलॉगही प्रचंड हिट झाले आहेत. चित्रपटातील असेच काही फेमस डायलॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आला आहोत...
 
 कसं काय आत्त्या बरं आहे का....हितनं मी थेट शेतात जाणार हाय.. थेट हां..!
 
 
 माझं नाव अर्चना पाटील.. मला १२वीला ५५टक्के मिळालेत. मला पोहायला आवडतं, पिक्चर पहायला आवडतो, बुलेटबी चालवायला आवडते.. अजून काय ग अने?
 
 
 चला रे... जिंदगी की यही रीत है, हार के बादही जीत है...!
 
 
 ए सल्या.. तुझ्यासारखं गुटखा खाऊन मरण्यापेक्षा आर्चीच्या प्रेमात मेलेलं बरं
 
 11 हजार जितने का छोडके मौका..अपनेही संघको देते धोका..कॅप्टन कुठं गेलाय नेमका
 
 
 मराठीत सांगितलेलं कळत नाय...इंग्लिशमधे सांगू..?
 
 
 ए मंग्या सोड त्याला.. पुन्हा त्याला हात तर लावून बघ मग इंग्लिशमध्ये सांगते तुला मला काय करायचयं ते...!