Join us

दोन वर्षांत नाकारले ७५ चित्रपट

By admin | Updated: May 26, 2016 02:40 IST

अभिनेता आदिनाथ कोठारे अतिशय विचार करून चित्रपटांची निवड करीत आहे. चित्रपटाची संकल्पना चांगली असल्याशिवाय तो करायचा नाही, असे बहुधा त्याने ठरविले आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे अतिशय विचार करून चित्रपटांची निवड करीत आहे. चित्रपटाची संकल्पना चांगली असल्याशिवाय तो करायचा नाही, असे बहुधा त्याने ठरविले आहे. तुमचा विश्वास बसणार नाही; पण गेल्या दोन वर्षांत त्याने तब्बल ७५ चित्रपट नाकारले आहेत. काम करायचे म्हणून कोणताही चित्रपट करायचा, हे त्याला पटतच नाही, असे त्याचे म्हणणे असल्याचे समजते. याच कारणामुळे वर्षभरात कमी चित्रपट आले तरी चालेल; पण चांगलेच चित्रपट साइन करायचे, असे आदीने ठरवले असल्याचे समजते.