Join us
Daily Top 2Weekly Top 5

67th National Film Awards: पल्लवी जोशी, सावनी रविंद्र या मराठमोळ्या कलाकारांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 18:27 IST

मराठमोळ्या पल्लवी जोशीला द ताशकंद फाईल्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. छिछोरे हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर मराठमोळ्या पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. द ताशकंद फाईल्स या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला.

बोर्डो या चित्रपटासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. 

पल्लवी जोशीने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. द ताशकंद फाईल्स मध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे-सर्वोत्कृष्ट चित्रपटमर्कर लॉयन ऑफ द अरेबियन सीसर्वोत्कृष्ट एडिटिंगजर्से (तेलुगू)सर्वोत्कृष्ट  गायिकासावनी रविंद्र - बार्डोसर्वोत्कृष्ट गायकबी प्राकसर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीपल्लवी जोशीसर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेताविजय सेतुपथीसर्वोत्कृष्ट अभिनेत्रीकंगना रणौत (मनिकर्णिका, पंगा)सर्वोत्कृष्ट अभिनेतामनोज वाजपेयी (भोसले)धनुष (तमीळ)सर्वोत्कृष्ट स्पेशल मेन्शनबिरयानी (मल्याळम)जौनकी पोरा (आसामी)लता भगवान करे (मराठी)पिकासू (मराठी)सर्वोत्कृष्ट मराठी फिल्मबार्डोसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटछिछोरेसामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटआनंदी गोपाळराष्ट्रीय इंटर्गेशनवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटताजमहाल 

सावनी रविंद्रने मराठीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटात देखील गायन केले आहे. तिला तिच्या गायनासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018पल्लवी जोशी