Join us
Daily Top 2Weekly Top 5

HOTNESS ALERT !! 47 वर्षांच्या या अभिनेत्रीने शेअर केलेत बिकिनी फोटो, पाहून मलायकाचाही पडेल विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:15 IST

म्हणायला ती 47 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहिल्यानंतर कुणाला विश्वास बसणार नाही.

ठळक मुद्देसध्या मंदिरा ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिने वयाची चाळीशी ओलांडलीय. म्हणायला ती 47 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहिल्यानंतर कुणाला विश्वास बसणार नाही. मंदिराची फिट बॉडी पाहून ती 47 वर्षांची आहे, हे पहिल्या नजरेत मनाला पटत नाही.   मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. ब-याचदा तिला या फोटोंमुळे ट्रोलही केले आहे. परंतु त्याची तमा न बाळगता मंदिरा तिचे फोटो शेअर करीत असते.  मंदिरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे. यादरम्यानच्या तिच्या बिकिनी फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  या फोटोमध्ये मंदिरा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

या फोटोंत मंदिराने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. बिकिनीतील तिचे  फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 फिट राहण्यासाठी मंदिरा केवळ जिमवर अवलंबून नाही. स्वीमिंग, योगा असे सगळे काही ती करते. मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळे आहे. मग तो इव्हेंट असो वा फंक्शन प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या अंदाजात बघावयास मिळते. मंदिरा बºयाचदा गौरव गुप्ताने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणे पसंत करते. 

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे.  सध्या मंदिरा ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात   नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  

टॅग्स :मंदिरा बेदी