Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०१६ मध्येच ‘कहानी’२ झळकणार चित्रपटगृहात

By admin | Updated: May 5, 2016 19:44 IST

विद्या बालन स्टारर कहानी २ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. २५ नोव्हेबंर २०१६ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होईल. विद्या बालन सोबत या चित्रपटात अर्जुन रामपालही मुख्य भुमीकेत आहे.

ऑनलाइनल लोकमत
मुंबई, दि. ५ : विद्या बालन स्टारर कहानी २ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. २५ नोव्हेबंर २०१६ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होईल. विद्या बालन सोबत या चित्रपटात अर्जुन रामपालही मुख्य भुमीकेत आहे. पुर्वी हा चित्रपट मार्च २०१७ प्रदिर्शित होणार होता. पण चित्रपटाचे शुटींग लवकर झाल्याने लवकर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी कहानी चित्रपटाची कथा लिहिली होती तसंच दिग्दर्शनही केलं होतं. या चित्रपटात विद्या बालनने प्रमुख भुमिका निभावली होती तर नवाझुद्दीन सिद्दीकी, इंद्रनील सेनगुप्ता, सास्वता चॅटर्जी यांनीदेखील महत्वाच्या व्यकिरेखा साकारल्या होत्या. 
 
२०१२ मध्ये आलेल्या सस्पेन्स थ्रिलर 'कहानी' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. कहानी चित्रपटात विद्या बालनने एका गरोदर महिलेची भुमिका निभावली होती. ज्यामध्ये विद्या आपल्या पतीच्या शोधात लंडनहून कोलकातामध्ये येते. विद्या बालनची ही भुमिका प्रेक्षकांना खुपच आवडली होती. विद्याला या चित्रपटासाठी अनेक अॅवॉर्डदेखील मिळाले होते. 
विद्या म्हणाली, सुजॉय आणि मी मिळून चित्रपट करतोय. कहानी २ पण तेवढाच उत्तम होणार अशी अपेक्षा आहे. सुजॉयकडे अजून महत्त्वाच्या स्क्रिप्ट्स आहेत. कहानी चित्रपट जिथे संपला होता, तिथूनच पुढे कहानी सुरू होणार का? यावर गाडा म्हणाले, ते बाकीची माहिती सुजॉयच देऊ शकेल.