करण जोहरच्या ‘शुद्धी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी सलमानला तब्बल 15क् कोटी रुपये मिळणार असल्याची बातमी आहे. ही बातमी खरी असेल, तर सलमान फीच्या बाबतीतही सर्वच रेकॉर्ड मोडणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रने दिलेल्या बातमीनुसार या चित्रपटासाठी सलमानला 15क् कोटी दिले जाणार आहेत. सूत्रंनुसार सलमानने फीच्या रूपात चित्रपटाची पहिल्या आठवडय़ातील कमाई आणि सॅटेलाईट राईटस्मधील 4क् टक्के मागितले आहेत. त्याशिवाय चित्रपटाला मिळणा:या नफ्यातील 2क् टक्के रक्कमही त्याला दिली जाणार आहे. ही रक्कम अंदाजे 15क् कोटी आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, एखादा अभिनेता किती फी घेतो, ही निर्माता आणि अभिनेता यांची वैयक्तिक बाब आहे; पण 15क् कोटींची रक्कम ऐकायलाही खूप मोठी वाटते.’