Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुळं नाही, तिळं नाही तर...; निपुण-वैदेहीच्या 'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 14:59 IST

'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमात अनेक सरप्राईज प्रेक्षकांना बघायला मिळणार यात शंका नाही (#1234TheFilm)

'एक दोन तीन चार' म्हणजे काय? नावापासूनच सिनेमाची उत्सुकता  शिगेला. गेल्या काही दिवसांपासून 'एक दोन तीन चार' च्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. आता 'एक दोन तीन चार' चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा यात शंका नाही. याशिवाय ट्रेलरमध्येच अनेक सरप्राईज दडलेले असल्याने मराठी प्रेक्षकांना एन्टरटेनमेंटचं संपूर्ण पॅकेज बघायला मिळणार यात शंका नाही.

'एक दोन तीन चार' चा धमाल ट्रेलर

'एक दोन तीन चार'च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की, सम्या-सायली या कपलच्या आयुष्यात आनंदाची बातमी येते. सायली गरोदर होते. त्यामुळे दोघांच्या लव्हस्टोरीला एक वेगळंच वळण येतं. पुढे ते दोघे डॉक्टरांकडे जातात तेव्हा त्यांना समजतं की त्यांना एक नाही दोन नाही तर एकाच वेळी चार मुलं होणार आहेत. त्यामुळे दोघांनाही आनंद होतो की धक्का बसतो ते कळत नाही. पुढे दोघांच्याही कुटुंबांना आनंद होते. वेगवेगळ्या कल्पना रंगतात. अशातच या कहाणीत आणखी एक ट्विस्ट येतो. तो ट्विस्ट कोणता हे तुम्हाला ट्रेलर पाहून कळेलच. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये अमेय वाघच्या भूमिकेची छोटीशी झलक दिसते.

'एक दोन तीन चार' मधील कलाकार

'एक दोन तीन चार' या सिनेमात निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी सोबतच इतर दमदार कलाकार जसे मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि करण सोनवणे हे कलाकार असणार आहेत. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता वाढणार नक्कीच! सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी लिहिले आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तूत, या सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे, रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे. १९ जुलैला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :वैदेही परशुरामीमराठी चित्रपटमराठी अभिनेतामराठी