आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये 'ही-मॅन' म्हणून ओळख मिळवणाऱ्या दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या मागे सुमारे ४५० ते ५०० कोटी रुपयांचे मोठे साम्राज्य सोडले आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या या विशाल संपत्तीचे त्यांच्या सहा अपत्यांमध्ये विभाजन कसे होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. धर्मेंद्र यांना दोन पत्नींकडून एकूण सहा मुले आहेत: प्रकाश कौर यांच्याकडून सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल तर हेमा मालिनी यांच्याकडून ईशा देओल आणि आहाना देओल.
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
कायदेतज्ज्ञांच्या मते, धर्मेंद्र यांच्या स्व-अर्जित मालमत्तेवर जसे की खंडाळ्याचा फार्महाऊस, मुंबईतील घरे, रेस्टॉरंट्स आणि गुंतवणूक त्यांच्या सहाही मुलांना कायदेशीररित्या समान हक्क मिळेल. परंतू, त्यांच्या पत्नींचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
हिंदू विवाह कायद्यातील काही कलमांनुसार, जरी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता केलेला दुसरा विवाह कायदेशीरदृष्ट्या 'अवैध' मानला गेला तरी, या दोन्ही विवाहांपासून जन्माला आलेली अपत्ये 'वैध' मानली जातात. त्यामुळे, हेमा मालिनी यांच्या मुली, ईशा देओल आणि आहाना देओल यांना देखील आपल्या वडिलांच्या मालमत्तेत सनी आणि बॉबी यांच्याप्रमाणेच समान वाटा मिळणार आहे.
हेमा मालिनी यांच्या वाट्याबद्दल काय?
सध्याच्या कायदेशीर नियमांनुसार, धर्मेंद्र यांनी त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांच्या नावाने जर कोणते मृत्युपत्र केले नसेल, तर त्यांना कायदेशीररित्या थेट संपत्तीत वाटा मिळणार नाही. मात्र, दोन्ही कुटुंबांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याने, संपूर्ण देओल कुटुंब आपापसात सामंजस्याने संपत्तीचे वाटप करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : Following Dharmendra's death, the division of his ₹450 crore estate among his six children from two wives is in question. Legally, all children, including those from Hema Malini, have equal rights to his self-acquired property. Hema Malini's direct inheritance depends on a will.
Web Summary : धर्मेंद्र के निधन के बाद, उनकी ₹450 करोड़ की संपत्ति का विभाजन उनकी दो पत्नियों से हुए छह बच्चों में कैसे होगा, यह सवाल है। कानूनी रूप से, हेमा मालिनी से हुए बच्चों सहित सभी बच्चों को उनकी स्व-अर्जित संपत्ति पर समान अधिकार है। हेमा मालिनी का सीधा उत्तराधिकार वसीयत पर निर्भर करता है।