PPF maturity calculator: बहुतांश लोकांना कोट्यधीश व्हायचं असतं आणि ते अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचे पर्याय शोधत असतात जिथे भरपूर नफा मिळतो. परंतु, गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न किती असेल आणि आयकराच्या कक्षेबाहेर राहायचं असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणुकीवर चांगला परतावा (PPF maturity calculator) आणि कर बचतीचे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करत असाल किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगले पैसे कमवू इच्छित असाल तर तुम्ही ही योजना निवडू शकता. पीपीएफ ही योजना अधिक लोकप्रिय आहे.
सर्वोत्तम पर्याय का मानला जातो?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सर्वात लोकप्रिय आहे कारण त्यात जमा केलेले पैसे, मिळालेलं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम ((PPF maturity calculator) पूर्णपणे करमुक्त असते. म्हणजे तो EEE श्रेणीत ठेवण्यात आला आहे. दरवर्षी ठेवींवर कर सवलतीचा दावा करण्याचा पर्याय असतो. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर भरावा लागत नाही. अकाऊंट मॅच्युअर झाल्यानंतर संपूर्ण रक्कम करमुक्त होते.
कोण गुंतवणूक करू शकतो?
देशातील कोणताही नागरिक या लघुबचत योजनेत (PPF) गुंतवणूक करू शकतो. हे खातं पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत उघडता येतं. प्रत्येक आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपयांची गुंतवणूक करता येते. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. मात्र, त्रैमासिक आधारावर व्याज निश्चित केलं जातं. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. याचा मॅच्युरिटी पीरियड १५ वर्षांचा आहे. या योजनेत संयुक्त खातं उघडण्याची सुविधा नाही. परंतु, नॉमिनी केले जाऊ शकते. HUF च्या नावानेही PPF Account उघडण्याचा पर्याय नाही. मुलांच्या बाबतीत पीपीएफ खात्यात पालकाचं नाव समाविष्ट केलं जातं. तथापि, हे केवळ वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत वैध आहे.
कसे बनाल कोट्यधीश?
पीपीएफ ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये कोट्यधीश बनणं सोपं आहे. त्यासाठी नियमित गुंतवणुकीची गरज आहे. समजा तुमचं वय २५ वर्षे आहे आणि तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक सुरू केली, आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान खात्यात १,५०,००० रुपये (कमाल मर्यादा) जमा केल्यास पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला १०,६५० रुपये केवळ व्याजासह जमा होतील. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमचा बॅलन्स १,६०,६५० रुपये असेल. पुढील वर्षी पुन्हा तसंच केल्यास खात्यात ३,१०,६५० रुपये शिल्लक राहतील. कारण, पुन्हा दीड लाख रुपये जमा होतील आणि त्यानंतर संपूर्ण रकमेवर व्याज दिलं जाईल. यावेळी व्याजाची रक्कम २२,०५६ रुपये असेल. कारण, यामध्ये चक्रवाढ व्याज मिळतं. आता समजा पीपीएफ मॅच्युरिटीची १५ वर्षे पूर्ण झाली असतील तर तुमच्या खात्यात ४०,६८,२०९ रुपये असतील. एकूण डिपॉझिट रक्कम २२,५०,००० रुपये असेल आणि १८,१८,२०९ रुपये केवळ व्याजातून मिळतील.
पीपीएफची सुरुवात वयाच्या २५ व्या वर्षी करण्यात केली, तर वयाच्या ४० व्या वर्षी म्हणजे वयाच्या १५ व्या वर्षानंतर तुमच्या हातात ४० लाखांहून अधिक रुपये असतील. पण नियोजन दीर्घकालीन असेल तर पैसा झपाट्यानं वाढेल. पीपीएफमध्ये मुदतपूर्तीनंतर खात्याला ५-५ वर्षांसाठी मुदतवाढ देता येते. जर गुंतवणूकदारानं पीपीएफ खातं ५ वर्षांसाठी वाढवलं तर वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत एकूण रक्कम ६६,५८,२८८ रुपये होईल. यामध्ये ३० लाख रुपये गुंतवणूक आणि ३६,५८,२८८ रुपये व्याज मिळणार आहे.
यानंतर पीपीएफ खात्याला पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. म्हणजेच आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देऊन २५ वर्षांपर्यंत ती वाढवावी लागेल. पुन्हा तुम्हाला वर्षाला १,५०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. वयाच्या ५० व्या वर्षी पीपीएफ खात्यात एकूण १,०३,०८,०१४ रुपये जमा होतील. गुंतवणूक ३७,५०,००० रुपयांपर्यंत पोहोचेल आणि त्यात ६५,५८,०१५ रुपयांचं व्याज असेल.
३५ वर्षांत किती गुंतवणूक?
जर तुम्ही निवृत्तीच्या दृष्टीनं यात गुंतवणूक केली असेल तर पीपीएफमध्ये ३५ वर्षे गुंतवणूक सुरू ठेवावी लागणार आहे. अशावेळी मॅच्युरिटी वयाच्या ६० व्या वर्षी असेल. त्यामुळे पीपीएफ खात्यात जमा होणारी एकूण रक्कम २ कोटी २६ लाख ९७ हजार ८५७ रुपये असेल. एकूण गुंतवणूक ५२,५०,००० रुपये असेल, तर व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न १,७४,४७,८५७ रुपये असेल.