Rupee fell further by 5 paise | रुपया आणखी १८ पैशांनी घसरला
रुपया आणखी १८ पैशांनी घसरला

मुंबई : मंगळवारी रुपया आणखी १८ पैशांनी घसरला. त्याबरोबर एक डॉलरची किंमत ७१.७८ रुपये झाली. जागतिक बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. त्याचा फटका रुपयाला बसला, असे आंतरबँक विदेशी
चलन बाजारातील सूत्रांनी सांगितले. सौदीतील तेल प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यान, सोमवारी रुपया ६८ पैशांनी घसरला होता.


Web Title: Rupee fell further by 5 paise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.