Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७७ हजारांपर्यंत मिळणार पगार; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७७ हजारांपर्यंत मिळणार पगार; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

RBI Recruitment 2021 for Non CSG Various Posts: भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

By बाळकृष्ण परब | Published: February 18, 2021 01:02 PM2021-02-18T13:02:30+5:302021-02-18T13:04:18+5:30

RBI Recruitment 2021 for Non CSG Various Posts: भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

RBI Recruitment 2021: Golden opportunity of job in Reserve Bank, salary up to 77 thousand; Such is the eligibility and conditions | रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७७ हजारांपर्यंत मिळणार पगार; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७७ हजारांपर्यंत मिळणार पगार; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

Highlightsभारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहेरिझर्व्ह बँकेने नॉन सीएसजी श्रेणीतील विविध पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहेइच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसाठी १० मार्चपर्यंत अर्ज करू शकतील

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेमध्येनोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये (Reserve Bank of India) विविध पदांसाठी भरती निघाली आहे. रिझर्व्ह बँकेने नॉन सीएसजी (RBI Non-CSG) श्रेणीतील विविध पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसाठी १० मार्चपर्यंत अर्ज करू शकतील. (RBI Recruitment 2021 for Non CSG Various Posts)

या भरतीप्रक्रियेसाठीच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढीलप्रमाणे आहेत

- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात - २३ फेब्रुवारी २०२१ 
- ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख - १० मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
- उमेदवारी अर्ज शुक्ल जमा करण्याची अखेरची तारीख १० मार्च २०२१
- परीक्षा - १० एप्रिल २०२१

अशी असेल वेतनश्रेणी
- लीगल ऑफीसर ग्रेड बी - ७७ हजार २०८ रुपये
- मॅनेजर - ७७ हजार २०८ रुपये
- असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) - ६३ हजार १७२ रुपये
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्यॉरिटी) - ६३ हजार १७२ 

असे आहे उमेदवारी अर्ज शुल्क 
सर्वसामान्य, ओबीसी, पीडब्ल्यडी वर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये
एससी, एसटी वर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये

अशी आहे पदांची संख्या 
- लीगल ऑफिसर ग्रेड बी  - ११ पदे 
- मॅनेजर (टेक्निकल सिव्हिली) - ०१ पद 
- असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) - १२ पदे
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्यॉरिटी) - ०५ पदे 
- एकूण पदे -२९ 

पात्रता 
- लीगल ऑफिसर ग्रेड बी - या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कायद्याची पदवी असावी. तसेच दोन वर्षांचा अनुभव असणेही आवश्यक आहे.
- मॅनेजर (टेक्निकल सिव्हिल) - या पदासाठी सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव 
- असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) - या पदासाठी विषय म्हणून इंग्रजी आणि हिंदी या विषयांमध्ये किमान द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्यॉरिटी) - या पदासाठी उमेदवाराकडे लष्कर, नौदल किंवा हवाईदलामध्ये किमान ५ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

Web Title: RBI Recruitment 2021: Golden opportunity of job in Reserve Bank, salary up to 77 thousand; Such is the eligibility and conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.