Lokmat Money > बिझनेस न्यूज > झिम्बाब्वेत डॉलरटंचाई

झिम्बाब्वेत डॉलरटंचाई

झिम्बाब्वेत नगदी रकमेची टंचाई निर्माण झाल्याने बँकेसमोर रांगाच रांगा दिसत होत्या. त्यामुळे सरकारने डॉलरच्या स्थानिक पातळीवर प्रति छापण्याचे ठरविले असून

By admin | Updated: June 3, 2016 02:37 IST2016-06-03T02:37:08+5:302016-06-03T02:37:08+5:30

झिम्बाब्वेत नगदी रकमेची टंचाई निर्माण झाल्याने बँकेसमोर रांगाच रांगा दिसत होत्या. त्यामुळे सरकारने डॉलरच्या स्थानिक पातळीवर प्रति छापण्याचे ठरविले असून

Zimbabwe Dollar Drought | झिम्बाब्वेत डॉलरटंचाई

झिम्बाब्वेत डॉलरटंचाई

हरारे : झिम्बाब्वेत नगदी रकमेची टंचाई निर्माण झाल्याने बँकेसमोर रांगाच रांगा दिसत होत्या. त्यामुळे सरकारने डॉलरच्या स्थानिक पातळीवर प्रति छापण्याचे ठरविले असून, नागरिकांनाही ठराविक रक्कमच खात्यातून काढता येणार आहे.
२००९ च्या प्रचंड महागाईनंतर सरकारने अमेरिकी आणि दक्षिण आफ्रि केच्या चलनाचा स्वीकार केलेला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जॉन यांनी सांगितले की, चलनाचा तुटवडा दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यता आहे.
अर्थात, नवीन नोटांची छपाई म्हणजे झिम्बाब्वेच्या डॉलरला पुन्हा चलनात आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होत आहे; पण ही शक्यता गव्हर्नर जॉन यांनी फेटाळून लावली. तथापि, सरकारच्या या योजनेवर अनेक तज्ज्ञांनी टीका केली आहे. हा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचे मत अर्थतज्ज्ञ जॉन रॉबर्टसन यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Zimbabwe Dollar Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.