Lokmat Money > बिझनेस न्यूज > युवकांनी व्यसनाधीनता सोडून खेळाकडे वळावे : मोतीवाला निपाणीत पतंग महोत्सवाचे उद्घाटन

युवकांनी व्यसनाधीनता सोडून खेळाकडे वळावे : मोतीवाला निपाणीत पतंग महोत्सवाचे उद्घाटन

निपाणी : पूर्वीच्या काळी मैदानी खेळ असल्याने युवा पिढी तंदुरुस्त बनत होती. पण आता मैदानी खेळ लुप्त होऊन संगणकीय खेळ आले आहेत. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असून, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडत आहेत. त्यासाठी युवकांनी व्यसनाधीनता सोडून खेळाकडे वळावे. त्यामुळे भावी पिढी सुदृढ होऊन देश बलवान बनेल, असे प्रतिपादन निपाणीतील रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांनी केले.

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:07+5:302014-11-21T22:38:07+5:30

निपाणी : पूर्वीच्या काळी मैदानी खेळ असल्याने युवा पिढी तंदुरुस्त बनत होती. पण आता मैदानी खेळ लुप्त होऊन संगणकीय खेळ आले आहेत. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असून, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडत आहेत. त्यासाठी युवकांनी व्यसनाधीनता सोडून खेळाकडे वळावे. त्यामुळे भावी पिढी सुदृढ होऊन देश बलवान बनेल, असे प्रतिपादन निपाणीतील रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांनी केले.

Youth should shift from addiction to sports: Inauguration of Motiwala Kite Festival | युवकांनी व्यसनाधीनता सोडून खेळाकडे वळावे : मोतीवाला निपाणीत पतंग महोत्सवाचे उद्घाटन

युवकांनी व्यसनाधीनता सोडून खेळाकडे वळावे : मोतीवाला निपाणीत पतंग महोत्सवाचे उद्घाटन

पाणी : पूर्वीच्या काळी मैदानी खेळ असल्याने युवा पिढी तंदुरुस्त बनत होती. पण आता मैदानी खेळ लुप्त होऊन संगणकीय खेळ आले आहेत. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असून, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडत आहेत. त्यासाठी युवकांनी व्यसनाधीनता सोडून खेळाकडे वळावे. त्यामुळे भावी पिढी सुदृढ होऊन देश बलवान बनेल, असे प्रतिपादन निपाणीतील रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांनी केले.
निपाणीतील आंदोलन नगरातील वक्रतुंड तरुण मित्र मंडळातर्फे शुक्रवारी पतंग महोत्सव स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रशांत चिकोर्डे, पप्पू मोतीवाला, अरुण खडके, सोमनाथ शिपुगडे, सदाशिव बेडगे, निखील पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी एच. ए. मोतीवाला यांच्या हस्ते हवेत पतंग सोडून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत कोल्हापूर, इचलकरंजीसह निपाणी परिसरातील ७५ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. महोत्सवात नानाविध रंगाचे पतंग व विविध आकाराच्या पतंगांचा सहभाग होता. या स्पर्धा तीन दिवस चालणार असून, सोमवारी सायंकाळी चार वाजता बक्षीस वितरण होणार आहे.
बक्षीस वितरण समारंभास कोल्हापुरातील श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, राजेश कदम, सीपीआय महेश्वरगौडा, महालिंग कोठीवाले, फौजदार धीरज शिंदे, पंकज पाटील, पै. बाबा महाडिक, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे (कोल्हापूर), रणजीत जाधव, रवींद्र शिंदे, विलास गाडीवडर, दत्तात्रय जोत्रे, दिलीप पठाडे, आदी उपस्थित होते.
-------------
फोटो २१ एनपीएन १
फोटो ओळ :
निपाणीत पतंग महोत्सवाचे उद्घाटन करताना रत्नपारखी एम. ए. मोतीवाला. शेजारी डॉ. प्रशांत चिकोडे, पप्पू मोतीवाला, बंटी कोकरे, आदी.

Web Title: Youth should shift from addiction to sports: Inauguration of Motiwala Kite Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.