कडरूवाडी : शिक्षणासाठी कमी खर्च; पण लग्नासाठी जास्त खर्च या नियमाला फाटा देत शहरातील ऑल मुस्लीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सौजन्याने तांबोळी आतार जमाअत मुस्लीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था कुडरूवाडीने सामुदायिक विवाह सोहळ्यासह अनेक उपक्रम राबवून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.5 वर्षात या संस्थेच्या वतीने 57 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहेत. विवाह सोहळ्यात वर्हाडींच्या जेवणाची उत्तम सोय, नाष्टा, थंड सरबत, आईस्क्रीम, खास पान असा शाही थाट जमाअतीच्या वतीने करण्यात येतो. विवाहाच्या वेळीच जमाअतच्या वतीने वधू-वर सूचक मेळावा, तालुक्याची तांबोळी आतार जमातच्या खानेसुमारीच्या पुस्तकाचे प्रकाशन, सर्वांसाठी मोफत आरोग्य शिबीर व औषधांचे वाटप करण्यात येते, हाजी लोकांचा सत्कारही करण्यात येतो. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजेदारांसाठी भोजन व शहरवासीयांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रम ठेवण्यात येतो. जमाअतच्या वतीने विविध जयंतीचे उपक्रम राबविले जातात.हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शकीलभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष समीरभाई मुलाणी, यासीनभाई बहामद, फय्याज बागवान, युसूफभाई दाळवाले, कमर पानवाले, प्रा. मिठ्ठमियाँ शेख, वसीमभाई मुलाणी, रफिक तांबोळी, शकील आतार, अहमद तांबोळी, इसाक आतार, मुबारक आतार, हाजी नजीर तांबोळी, रशीद आतार, सिकंदर तांबोळी, शरीफ तांबोळी, हरुण तांबोळी, सलीम तांबोळी, रज्जाक तांबोळी, महेबूब तांबोळी, आरिफ तांबोळी, रौफ आतार, महामूद तांबोळी, अब्दुल लतीब तांबोळी, राजू तांबोळी, अकबर तांबोळी यांच्यासह अनेक तरुण पर्शिम करतात.चौकटीसाठी..सालाबादप्रमाणे याहीवर्षी 3 मे रोजी मुस्लीम समाजासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुकांनी त्वरित आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन तांबोळी आतार जमाअतच्या वतीने करण्यात आले आहे. -------------------------कुडरूवाडी : गोटी सोडा, लेमन जुन्या पद्धतीतील बर्फापासून आईस्क्रीम असा प्रवास करीत आज अत्याधुनिक नामांकित कंपन्यांच्या तोडीस तोड देणारे आईस्क्रीम कुडरूवाडीसारख्या ग्रामीण भागात बनविण्याची परंपरा अपना कोल्ड्रिंक्सने आजही सुरू ठेवली आहे.1950 पासून ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी पैगंबरवासी अब्दुल कादर बाळाभाई बागवान (पानवाले) यांनी सुरू केली होती. त्या काळात गोटी सोडा व लेमन सोडा पिण्यासाठी लोक पंचक्रोशीतून येत होते. सर्वांना हे पेय आवडायचे, त्यातूनच त्यांनी आपला हा व्यवसाय इतरत्र वाढविला. इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्ष तयार झाला आहे.त्यानंतर 1980 साली आईस्क्रीम ही संकल्पना अ. कादर यांचे चिरंजीव हाजी अ. लतीब बागवान यांनी पहिल्यांदा कुडरूवाडी शहरात आणली. मॅन्युअल मशीनद्वारे बर्फ व मिठापासून आईस्क्रीमचे उत्पादन त्यांनी आपल्या छोट्याशा घरातूनच सुरू केले. त्यांच्या या कामात त्यांच्या कुटुंबीयांचाही मोठा हातभार होता. याची मार्केटमधील वाढती मागणी पाहून त्यांनी शहरात पहिल्यांदाच अपना कोल्ड्रिंक्सचे दुकान गांधी चौकात सुरू केले. थंडपेयातील हे शहरातील पहिलेच दुकान होते.शहरातील अनेक लोक येथे गर्दी करून आईस्क्रीम खात असत. याला मागणी वाढली, पण कुटुंबातील मुले लहान असल्याने ते आपल्या धंद्यात विस्तार करू शकले नाही. मात्र त्यांचे स्वप्न होते की, आपले आईस्क्रीम नामांकित कंपनीच्या तोडीला आहे. यासाठी शहरात मोठे आईस्क्रीम प्लँट उभे करावे, यासाठी त्यांनी मोठा खटाटोप केला. त्यांना साथ त्यांच्या कुटुंबीयांसोबतच त्यांच्या मुलांनीही दिली. मात्र ते लहान असल्याने त्यांना आईस्क्रीम बनविण्याचे बाळकडू मिळाले.यासोबतच त्यांनी दुधापासून दूध कोल्ड्रिंक्स, लस्सी, मलई लस्सी, मस्तानी, मावा कुल्फी, दुधापासून केलेले सर्व प्रकारचे आईस्क्रीम बनविण्याचे कामही टप्प्याटप्प्याने त्यांनी सुरू केले. याची उत्पादन क्षमता प्रतिदिन 200 लिटर होती. 2012 साली त्यांनी ती क्षमता वाढवून 1 हजार लिटर केली. पुन्हा ग्राहकांचा प्रतिसाद व वाढती मागणी पाहून त्यांनी ती क्षमता येत्या हंगामात 2 हजार लिटरपर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे.हाजी अ. लतीब बागवान यांचे थोरले चिरंजीव रियाज बागवान यांनी आपल्या कल्पकतेने बायपास रोडला मोठा आईस्क्रीम प्लँट सुरू केला असून, याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. येथे मशिनरी उभारणीचे काम सुरू आहे. कुर्डूवाडी शहरातील आईस्क्रीम क्षेत्रातील ही मोठी क्रांती असून, यामुळे शहराचे नाव पूर्ण राज्यात होणार आहे.यात लहान कप, मोठा कप, आईस्क्रीम कोन, चोकोबार, फॅमिली पॅक, कुल्फी, पंजाबी कुल्फी, आईस्क्रीम टब, पार्टी पॅक आदींचे उत्पादन सुरू आहे. या वर्षासाठी आईस्क्रीम खव्वयांसाठी डेली फ्रेश या नवीन प्लँटमध्ये खास ऑफर आणून 750 मिलीसोबत 750 मिली. मोफत आणली आहे. सोलापूर जिल्?ात सर्व डायफ्रूट आणि फ्रूट, केकपासून तयार होणारे फ्रॉस्टी केक हे त्यांचे आगामी उत्पादन आहे.त्यासोबतच पुढील वर्षापासून म्हशीचे तूप, र्शीखंड, लस्सी, दूध कोल्ड्रिंक्स, ताक यांचे अत्याधुनिक पॅकिंग होऊन प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध करून देण्याचा बागवान कुटुंबीयांचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.मॅनेजर- दत्ता कवितके, संचालक- मुस्ताक बागवान, फय्याज बागवान.टेंभुर्णी येथेही धनर्शी हॉटेलसमोर शाखा आहे.
आपली माती, आपली माणसं (माढा तालुका) शकील तांबोळी
कुडरूवाडी : शिक्षणासाठी कमी खर्च; पण लग्नासाठी जास्त खर्च या नियमाला फाटा देत शहरातील ऑल मुस्लीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सौजन्याने तांबोळी आतार जमाअत मुस्लीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था कुडरूवाडीने सामुदायिक विवाह सोहळ्यासह अनेक उपक्रम राबवून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
By admin | Updated: April 4, 2015 01:53 IST2015-04-04T01:53:23+5:302015-04-04T01:53:23+5:30
कुडरूवाडी : शिक्षणासाठी कमी खर्च; पण लग्नासाठी जास्त खर्च या नियमाला फाटा देत शहरातील ऑल मुस्लीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सौजन्याने तांबोळी आतार जमाअत मुस्लीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था कुडरूवाडीने सामुदायिक विवाह सोहळ्यासह अनेक उपक्रम राबवून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
