Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

NPS Vatsalya Yojana: आपल्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आजपासूनच त्यांचा कोट्यधीश बनण्याचा प्रवास सुरू करू शकता.

By जयदीप दाभोळकर | Updated: May 2, 2025 14:34 IST2025-05-02T14:29:09+5:302025-05-02T14:34:22+5:30

NPS Vatsalya Yojana: आपल्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आजपासूनच त्यांचा कोट्यधीश बनण्याचा प्रवास सुरू करू शकता.

You can make your children millionaires by investing just Rs 1000 NPS Vatsalya Yojana What is this scheme | केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

NPS Vatsalya Yojana: आपल्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आजपासूनच त्यांचा कोट्यधीश बनण्याचा प्रवास सुरू करू शकता. मुलांचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी महिन्याला फक्त १००० रुपयांची गुंतवणूक सुरू करा. मुलांच्या नावाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) वात्सल्य योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितकं आपल्या मुलांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल.

एनपीएस वात्सल्य कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर मुलांना कोट्यधीश बनवलं जाऊ शकतं. दर महिन्याला केलेल्या छोट्या गुंतवणुकीतून मोठा फंड तयार करता येतो.

CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे

जर तुम्ही मुलाच्या जन्मानंतर दरमहा त्याच्या नावावर १,००० रुपये गुंतवण्यास सुरुवात केली आणि मूल १८ वर्षांचं होईपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवली तर एकूण गुंतवणूक रक्कम २,१६,००० रुपये होईल. जर तुम्हाला यावर वार्षिक १०% परतावा मिळाला तर ही रक्कम ६,०१,९०९ रुपये होईल. तुमचं मूल कोट्यधीश कसं होईल?

एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत, मूल १८ वर्षांचे झाल्यावर, २.५ लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याचा आणि उर्वरित रक्कम पेन्शन योजनेत गुंतवण्याचा पर्याय आहे. आता जर ही गुंतवणूक वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत चालू ठेवली तर सुमारे ४ कोटी रुपये पेन्शन फंडात जमा होतील.

पेन्शन फंडाचे फायदे

एनपीएस वात्सल्य योजनेत मुलाच्या नावे जमा झालेल्या निधीच्या किमान ४० टक्के रक्कम फंड अॅन्युइटीसाठी ठेवावी लागणार आहे. जेणेकरून तुम्हाला ते पेन्शनवर मिळू शकतील.

एनपीएस वात्सल्य योजनेचे फायदे

१. मुलांसाठी रिटायरमेंट फंड तयार करता येतो. जेणेकरून दीर्घकालीन लाभ मिळू शकतील.
२. ही योजना चक्रवाढ व्याजाचा लाभ देते, ज्यामुळे लवकर गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळेल.
३. केवळ १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल. 
४. इक्विटी, डेट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये याचा पर्याय असतो.
५. बाजाराशी निगडित परताव्यात १०-१२% पर्यंत संभाव्य फायदा होण्याची शक्यता आहे.
६. अंशत: पैसे काढणं, शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी २५% पर्यंत पैसे काढता येतील.
७. मूल १८ वर्षांचं झाल्यावर खातं एनपीएस टियर-१ मध्ये बदलतं.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: You can make your children millionaires by investing just Rs 1000 NPS Vatsalya Yojana What is this scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.