Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा चहा उत्पादन १२० कोटी किलोवर जाणार

यंदा चहा उत्पादन १२० कोटी किलोवर जाणार

यंदा देशातील चहा उत्पादन १२० कोटी किलोग्रॅमची पातळी पार करण्याची शक्यता आहे.

By admin | Updated: July 28, 2014 03:08 IST2014-07-28T03:08:25+5:302014-07-28T03:08:25+5:30

यंदा देशातील चहा उत्पादन १२० कोटी किलोग्रॅमची पातळी पार करण्याची शक्यता आहे.

This year tea production will go up to 120 crores | यंदा चहा उत्पादन १२० कोटी किलोवर जाणार

यंदा चहा उत्पादन १२० कोटी किलोवर जाणार

कोलकाता : यंदा देशातील चहा उत्पादन १२० कोटी किलोग्रॅमची पातळी पार करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देशात १२० कोटी किलोग्रॅम एवढे विक्रमी चहा उत्पादन झाले होते.
चहा बोर्डाचे चेअरमन सिद्धार्थ यांनी ही माहिती दिली. मान्सूनच्या अनियमिततेमुळे ३.१ कोटी किलोग्रॅम पिकाचे नुकसान झाले आहे; मात्र तरीही यानंतरच्या महिन्यात अधिक उत्पादनाद्वारे याची भरपाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंद पडलेले चहा मळे पुन्हा चालू करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारशी संपर्क साधणार असल्याचे ते म्हणाले.भारत हा जगातील सर्वांत मोठा चहा उत्पादक देश आहे. आशियात श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात चहा उत्पादन होते. (वृत्तसंस्था)

Web Title: This year tea production will go up to 120 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.