Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा अर्थसंकल्पातून सुरू होईल कंपनी करात कपात

यंदा अर्थसंकल्पातून सुरू होईल कंपनी करात कपात

यंदाच्या अर्थसंकल्पात कंपनी करात कपात आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या करसवलती हळूहळू परत घेण्याची सुरुवात अर्थमंत्री अरुण जेटली करू शकतात

By admin | Updated: February 25, 2016 03:12 IST2016-02-25T03:12:14+5:302016-02-25T03:12:14+5:30

यंदाच्या अर्थसंकल्पात कंपनी करात कपात आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या करसवलती हळूहळू परत घेण्याची सुरुवात अर्थमंत्री अरुण जेटली करू शकतात

This year the tax cut will start from the company | यंदा अर्थसंकल्पातून सुरू होईल कंपनी करात कपात

यंदा अर्थसंकल्पातून सुरू होईल कंपनी करात कपात

नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात कंपनी करात कपात आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या करसवलती हळूहळू परत घेण्याची सुरुवात अर्थमंत्री अरुण जेटली करू शकतात, असे उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेटली २९ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील.
कंपनी करात एक टक्क्याची घट केली जाऊ शकते. अनेक उत्पादनांवरील अबकारी आणि इतर करांमध्ये दिली जाणारी सूट बंद केली जाऊ शकते. सरकारने अर्थसंकल्पाच्या आधी उद्योग जगताशी केलेल्या चर्चांमध्ये याचे संकेत दिले होते. जेटली यांनी २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पात देशातील उद्योगांना प्रतिस्पर्धी बनविण्यासाठी कंपनी करामध्ये चार वर्षांत सध्याचा ३० टक्के कमी करून २५ टक्के करण्याची घोषणा केली होती.
उद्योग मंडळ असोचेमच्या अप्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष निहाल कोठारी म्हणाले की,‘‘खाद्य उत्पादनासह जवळपास ३०० उत्पादनांवरील अबकारी कर सूट बंद केली जाऊ शकते. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होईल या हिशेबाने नियोजन होत आहे.

 

Web Title: This year the tax cut will start from the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.