मनोज गडनीस, मुंबई
भारतीय अर्थकारणातील सुधार आणि त्या अनुषंगाने शेअर बाजारातील सकारात्मक घडामोडी या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांना शेअर बाजारात प्राथमिक भाग विक्री करण्याचे वेध लागले असून, चालू आर्थिक वर्षात भारतीय शेअर बाजारात तब्बल ३० हजार कोटी रुपये मूल्याचे आयपीओ शेअर बाजाराच्या वाटेवर आहेत.
सेबी आणि आयपीओसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या ‘सेबी’ने आतापर्यंत सुमारे २३ कंपन्यांच्या १५ हजार कोटी रुपयांच्या प्राथमिक समभाग विक्रीला हिरवा कंदिल दिला आहे. यापैकी काही आयपीओ बाजारात सध्या भाग विक्री करीत आहेत, तर उर्वरित येत्या काही दिवसांत भाग विक्री करताना दिसतील, तर आणखी सुमारे ३३ कंपन्यांनी आयपीओसाठी आपली कार्यवाही पूर्ण करीत सेबीकडे अनुमतीसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. हे प्रस्ताव अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचे आहेत. बाजार विश्लेषक अजय शहा यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून बाजारात असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपली समभाग विक्री रोखून धरली होती; मात्र आता जागतिक मंदीचे सावट संपल्यामुळे कंपन्यांना समभाग विक्रीचे वेध लागले आहेत.
यंदा येणार ३० हजार कोटी रुपयांचे आयपीओ
भारतीय अर्थकारणातील सुधार आणि त्या अनुषंगाने शेअर बाजारातील सकारात्मक घडामोडी या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांना शेअर बाजारात प्राथमिक भाग विक्री करण्याचे वेध लागले असून
By admin | Updated: April 21, 2016 03:45 IST2016-04-21T03:45:13+5:302016-04-21T03:45:13+5:30
भारतीय अर्थकारणातील सुधार आणि त्या अनुषंगाने शेअर बाजारातील सकारात्मक घडामोडी या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांना शेअर बाजारात प्राथमिक भाग विक्री करण्याचे वेध लागले असून
