नवी दिल्ली : यंदा निर्गुंतवणुकीद्वारे सरकारची प्राप्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. यंदा आतापर्यंत सरकारी उपक्रमातील भागभांडवल विकून सरकारने ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा (५.३ अब्ज डॉलर) अधिक रक्कम मिळविली आहे.
विशेष म्हणजे त्यातील मोठा वाटा भारतीय जीवन विमा महामंडळाने खरेदी केला आहे. २०१५ वर्ष संपत आले असताना २०१६ मध्ये करावयाच्या निर्गुंतवणुकीची सरकारची योजना तयार आहे.
पुढील वर्षी एनटीपीसी, कोल इंडिया, ओपन जीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या भागभांडवलाची विक्री केली जाणार आहे. गेल्या वर्षी निर्गुंतवणुकीद्वारे सरकारने १८ हजार कोटी रुपये प्राप्त केले होते. २०१३ मध्ये हा आकडा २२ हजार कोटी होता. याचा अर्थ यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सरकारला दुप्पट कमाई झाली आहे.
पुढील वर्षी निर्गुंतवणुकीद्वारे ५५ हजार कोटी प्राप्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसे झाल्यास वित्तीय तुटीचे लक्ष्य प्राप्त करण्यास सरकार यशस्वी ठरेल; पण त्यासाठी सरकार योग्य त्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीची प्रतीक्षा करणार आहे. खनिज तेल आणि धातू बाजार यावर निर्गुंतवणूक अवलंबून असेल. निर्गुंतवणुकीशी संबंधित अनेक कंपन्या या क्षेत्राशी निगडित आहेत. यादीतील उपक्रमाचे भागभांडवल विकण्यासाठी सूचना देण्याचा आवधी कमी करून तो केवळ एक दिवस करावा यासाठी निर्गुंतवणूक विभाग दडपणाखाली आहे; पण सेबीची त्याला तयारी नाही. किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर विक्रीची माहिती मिळविण्यासाठी योग्य तो अवधी मिळण्यास हवा, अशी ‘सेबी’ची भूमिका आहे.
यंदा निर्गुंतवणुकीद्वारे मिळाली दुप्पट रक्कम
यंदा निर्गुंतवणुकीद्वारे सरकारची प्राप्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. यंदा आतापर्यंत सरकारी उपक्रमातील भागभांडवल विकून सरकारने ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा
By admin | Updated: December 20, 2015 22:39 IST2015-12-20T22:39:06+5:302015-12-20T22:39:06+5:30
यंदा निर्गुंतवणुकीद्वारे सरकारची प्राप्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. यंदा आतापर्यंत सरकारी उपक्रमातील भागभांडवल विकून सरकारने ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा
