फटो हॉर्ड कॉपी ...कॅप्शन : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वंदना शर्मा यांच्यासोबत असोसिएशनचे नवीन पदाधिकारी. - वंदना शर्मा पुन्हा अध्यक्ष : व्हीआयए लेडिज विंगची नवी कार्यकारिणीनागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) लेडिज विंगच्या अध्यक्षपदी वंदना शर्मा यांची सलग दुसऱ्या वर्षी सर्वानुमते निवड करण्यात आली. साची मलिक यांची सचिवपदी निवड झाली. व्हीआयएचे माजी अध्यक्ष आणि लेडिज विंगचे संयोजक सुरेश अग्रवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा आणि वर्ष २०१५-१६ ची कार्यकारिणी, पदाधिकारी व सदस्यांचे त्यांनी स्वागत केले. उपाध्यक्षपदी रिता लांजेवार, इंदू क्षीरसागर, मनिषा बावनकर, कोषाध्यक्षा पूनम लाला आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून शिखा खरे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये मिताली रफीक, फैदा हैदर, रश्मी कुळकर्णी, अल्का अंबागडे, अनामिका मोदी, सल्लागार समिती सदस्यांमध्ये सरला कामदार, सरिता पवार, प्रफुल्लता रोडे, मधुबाला सिंह, माजी अध्यक्षा अनिता राव, सईदा हक, सरिता पवार, चित्रा पराते, वाय. रमनी, नीलम बोवाडे, अंजली गुप्ता यांचा समावेश आहे. विंग अध्यक्षा वंदना शर्मा यांनी नवीन चमूचे स्वागत करताना अध्यक्षीय भाषण दिले. सर्व माजी अध्यक्षा आणि कार्यकारिणीचे आभार मानले. महिलांच्या विकासासाठी कार्य करताना असोसिएशनला नवीन ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न राहील, असे शर्मा म्हणाल्या. सुरेश अग्रवाल म्हणाले, विदर्भातील प्रतिभाशाली महिलांनी व्यापार-उद्योग क्षेत्रात पुढे येऊन आत्मनिर्भर व्हावे. प्रारंभी वंदना शर्मा यांनी सुरेश अग्रवाल, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सचिव रोहित अग्रवाल यांचे स्वागत केले. संचालन शिखा खरे आणि पूनम लाला यांनी केले तर साची मलिक यांनी आभार मानले.
महिलांच्या विकासासाठी कार्य करणार
फोटो हॉर्ड कॉपी ...
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:25+5:302015-07-29T00:42:25+5:30
फोटो हॉर्ड कॉपी ...
