औंगाबाद : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपतीपाठोपाठ महालक्ष्मीचे मंगळवारी २ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होत आहे. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी महिला सज्ज झाल्या आहेत. मुखवट्यापासून ते साडीपर्यंत सर्व खरेदी करण्यात आली असून, बहुतांश घरांत मखमली कपड्यांचे मखरही उभारण्यात आले आहे. महालक्ष्मीचे आगमन मंगळवारी होत आहे. बुधवारी ३ रोजी महालक्ष्मीची विधीवत पूजा करण्यात येणार आहे व गुरुवारी ४ रोजी विसर्जन करण्यात येणार आहे. नवीन लग्न झाल्यावर पहिल्या सणासाठी महालक्ष्मीचे नवीन मुखवटे खरेदी करावे लागतात. ज्यांच्याकडील मुखवटे जुने झाले असतील मुखवटे खरेदी करीत असतात. मागील १५ दिवसांपासून शहरात मुखवटे, कोठ्या, कपडे, दागिने खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून आली. अनेक जण सहपरिवार साहित्य खरेदीसाठी बाजारात आले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनीही आकर्षक मखरात महालक्ष्मीच्या मूर्तीला सजवून ठेवले होते. रेडिमेड साडीमध्ये महालक्ष्मी कशी दिसेल हे महिलांच्या लक्षात येते. तेव्हा महालक्ष्मीच्या आगमनाच्या आदल्या दिवशी मुखवटे, कपडे खरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती. कोणी मुखवटे, पत्र्यांच्या कोठ्या खरेदी झाल्यावर साड्या, तर काही जण रेडिमेड साड्या खरेदी करताना दिसून आले. बांगड्या, दागिन्यांचीही उत्साहात खरेदी सुरू होती. काही दुकानदारांनी कापडी मंडपही तयार करून ठेवले होते. रेडिमेड साडी तयार करणारे एम. बी. बोंबले यांनी सांगितले की, १५ वर्षांपूर्वी महालक्ष्मीसाठी रेडिमेड साड्या महिला खरेदी करीत नव्हत्या; पण आता बहुतांश महिलांचा रेडिमेड साड्यांवरच भर आहे. तशी साडी महालक्ष्मीला नेसविण्याचा कल असून, यासाठी तासभर वेळ जातो. नोकरी करणार्या महिला महालक्ष्मीसाठी रेडिमेड साडी खरेदी करणे पसंत करीत आहेत. चौकटफुलांच्या हारासाठी बुकिंग बुधवारी महालक्ष्मीचे घरोघरी विधीवत पूजन होणार आहे. या दिवशी ज्येष्ठा, कनिष्ठ महालक्ष्मी, मुलगा व मुलगी यांना स्वतंत्र हार घातला जातो. ऐनवेळेवर फजिती नको म्हणून अनेकांनी दोन दिवस अगोदरच हारांसाठी फुलवाल्यांकडे बुकिंग करणे सुरू केले होते. कॅप्शनमहालक्ष्मीसाठी रेडिमेड साडी खरेदी करताना महिला.
महालक्ष्मीच्या स्वागतासाठी महिलांची लगबग
औरंगाबाद : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपतीपाठोपाठ महालक्ष्मीचे मंगळवारी २ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होत आहे. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी महिला सज्ज झाल्या आहेत. मुखवट्यापासून ते साडीपर्यंत सर्व खरेदी करण्यात आली असून, बहुतांश घरांत मखमली कपड्यांचे मखरही उभारण्यात आले आहे.
By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST2014-09-01T22:45:32+5:302014-09-01T22:45:32+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपतीपाठोपाठ महालक्ष्मीचे मंगळवारी २ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होत आहे. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी महिला सज्ज झाल्या आहेत. मुखवट्यापासून ते साडीपर्यंत सर्व खरेदी करण्यात आली असून, बहुतांश घरांत मखमली कपड्यांचे मखरही उभारण्यात आले आहे.
