Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > यावेळीही व्याजदरात कपात होणार का? मे मध्ये विदेशी पतसंस्थांकडून १९,८६० कोटींची खरेदी

यावेळीही व्याजदरात कपात होणार का? मे मध्ये विदेशी पतसंस्थांकडून १९,८६० कोटींची खरेदी

मागील दोन वेळेप्रमाणे व्याजदरामध्ये थोडी तरी कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

By प्रसाद गो.जोशी | Updated: June 2, 2025 14:25 IST2025-06-02T14:23:20+5:302025-06-02T14:25:34+5:30

मागील दोन वेळेप्रमाणे व्याजदरामध्ये थोडी तरी कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Will there be a cut in interest rates this time too? Purchase of Rs 19,860 crore from foreign credit institutions in May | यावेळीही व्याजदरात कपात होणार का? मे मध्ये विदेशी पतसंस्थांकडून १९,८६० कोटींची खरेदी

यावेळीही व्याजदरात कपात होणार का? मे मध्ये विदेशी पतसंस्थांकडून १९,८६० कोटींची खरेदी

प्रसाद गो. जोशी: भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे या सप्ताहात जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदरामध्ये कपात होणार का? याकडे बाजाराचे लक्ष आहे. परकीय वित्तसंस्थांची भूमिका व टॅरिफबाबतच्या घडामोडी याचाही बाजारावर परिणाम होणार आहे. हा सप्ताह थोडाफार मागील सप्ताहाप्रमाणेच असू शकतो. आहे. भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरणाची घोषणा शुक्रवारी करणार आहे. यावेळीही मागील दोन वेळेप्रमाणे व्याजदरामध्ये थोडी तरी कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास वित्तसंस्था बाजारात आक्रमकपणे गुंतवणूक करतील, असा अंदाज आहे. 

मे महिन्यात विदेशी पतसंस्थांकडून १९,८६० कोटी रुपयांची खरेदी

  • मे महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये परकीय वित्तसंस्था या खरेदीच्या भूमिकेमध्ये असलेल्या दिसून आल्या. या परदेशी वित्तसंस्थांनी संपूर्ण मे महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारातून १९,८६० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. 
  • याशिवाय बॉण्डमध्येही १९,६१५ कोटी रुपये गुंतविण्यात आले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने होत असलेल्या विकासामुळे परकीय वित्तसंस्था भारतामध्ये गुंतवणूक करण्याला उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
  • एप्रिल महिन्यातही या संस्थांनी ४२२३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, याआधी सन २०२५मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतलेले असल्याने परकीय वित्तसंस्थांनी काढून घेतलेली रक्कम ९२,४९१ कोटी रुपयांवर आला आहे.


गत सप्ताहात जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी आशादायक असून, त्यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था आणखी भक्कम होण्याची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे भारतामधील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय मान्सूनची होणारी प्रगती आणि टॅरिफबाबत होणाऱ्या घडामोडी यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे.

Web Title: Will there be a cut in interest rates this time too? Purchase of Rs 19,860 crore from foreign credit institutions in May