भीमाशंकर अभयारण्यातील 58 कुटुंबाना हलविणार
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:21+5:302014-09-11T22:31:21+5:30

भीमाशंकर अभयारण्यातील 58 कुटुंबाना हलविणार
>सिद्धगडचे पुनवर्सन : विस्थापितांना घर, दोन हेक्टर जमीन मिळणारभीमाशंकर : पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर भीमाशंकर अभयारण्यातील आंबेगाव तालुक्यातील साखरमाची व मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथील डोंगराळ भागातील 58 कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी सिद्धगड येथे बैठक घेऊन पुढच्या पावसाळ्याच्या आत स्थानिकांना नवीन जागेत स्थलांतरित केले जातील, असे सांगितले.माळीण दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी साखरमाची येथे दरड पडली. त्यात मनुष्यहानी झाली नाही. मात्र, या लोकांचा रस्ता बंद झाला, शेतांमध्ये माती साचली. त्यामुळे ग्रामस्थ मुरबाड तालुक्यातील उचल गावात स्थलांतरित झाले. सिद्धगडवाडी सुद्धा उंच डोंगरावर वसलेली आहे. या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी होती. साखरमाचीत 16 तर सिद्धगडमध्ये 42 कुटुंबे आहेत. दोन्ही वाड्या वन्यजीव विभागाकडे वर्ग करून वन विभागाकडून मुरबाड तालुक्यातील जागा घेऊन तेथे या वाड्यांचे पुनर्वसन करायचे, असा शासनाचा प्रस्ताव आहे. मुरबाड तालुक्यातील ऐनाचीवाडी, धापडपाडा व लांबाचीवाडी येथे जागा पाहिली आहे. त्यातील एक जागा नि?ित करून संबंधित प्रस्ताव ठाण्याचे जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षकांनी सप्टेंबरअखेर सरकारकडे पाठवायचा आहे. वारसनोंद करून मूळ कुटुंबप्रमुख व सहधारक असे 125 कुटुंब होत आहेत. (प्रतिनिधी)----------------पुनर्वसनामध्ये कुटुंबप्रमुखास घर, दोन हेक्टर जमीन व शेतीसाठी दहा लाख रुपये देण्यात येतील. वारसनोंदीतून नवीन तयार होणार्या सहधारकांना घर व जमीन घेण्यासाठी दहा लाख रुपये दिले जातील. भूमिहीन कुटुंबास एक एकर जमीन व घर देण्यात येईल.---------------साखरमाचीतील कुटुंबांचे रेशनकार्ड ठाणे जिलत वर्ग केले जातील. त्यांना तात्पुरती घरे व गुरांना गोठा बांधून दिला जाईल.