Lokmat Money > बिझनेस न्यूज > औद्योगिक विकासाची गती वाढविणार -मुख्यमंत्री

औद्योगिक विकासाची गती वाढविणार -मुख्यमंत्री

उद्योगाच्या वाढीस खीळ घालणाऱ्या नियम व कायद्यात बदल करण्यासह परवानगीची प्रक्रिया सुलभ व गतिमान करून राज्याला गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम स्थान

By admin | Updated: January 17, 2015 01:11 IST2015-01-17T01:11:16+5:302015-01-17T01:11:16+5:30

उद्योगाच्या वाढीस खीळ घालणाऱ्या नियम व कायद्यात बदल करण्यासह परवानगीची प्रक्रिया सुलभ व गतिमान करून राज्याला गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम स्थान

Will increase the pace of industrial development- Chief Minister | औद्योगिक विकासाची गती वाढविणार -मुख्यमंत्री

औद्योगिक विकासाची गती वाढविणार -मुख्यमंत्री

मुंबई : उद्योगाच्या वाढीस खीळ घालणाऱ्या नियम व कायद्यात बदल करण्यासह परवानगीची प्रक्रिया सुलभ व गतिमान करून राज्याला गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम स्थान देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मुंबईला शांघाय नव्हे तर मुंबईला मुंबईच बनविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तिसऱ्या महाराष्ट्र इकोनॉमिक समिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग सुरू करण्यासाठी सध्या अनेक प्रकारच्या परवानग्यांची आवश्यकता असते. याकरिता खूप कालावधी व्यतीत होतो. मात्र तंत्रज्ञानाची मदत घेऊन हा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने एक खिडकी योजना सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येतील. दरम्यान, या कार्यक्रमात विख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना ‘प्राईड आॅफ महाराष्ट्र ’ या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, एल अँड टीचे संचालक के. वेंकटरामन रेडी पोर्टचे डॉ. अर्नेस्ट जोसेफ आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Will increase the pace of industrial development- Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.