Lokmat Money > बिझनेस न्यूज > चरित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

चरित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

चरित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:23+5:302014-09-12T22:38:23+5:30

चरित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

Wife's blood over suspicion of character | चरित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

चरित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून

ित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून
नागभीड (जि़ चंद्रपूर) : चारित्र्यावर संशय घेवून पतीने पत्नीचा कुर्‍हाडीने घाव घालून खून केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील मेंढा (किरमिटी) येथे घडली. वंदना हरिदास उईके असे मृताचे नाव आहे. पती हरिदास तिकडू उईके (४०) याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी वंदना आणि हरिदास यांचा विवाह झाला. त्यांना गौरव (११) आणि सौरभ (१४) अशी दोन मुले आहेत. लहान मुलाची तब्येत बरी नसल्याने वंदना मुलांसह पोळ्यापासून माहेरी मेंढा (किरमिटी) येथे आली होती. दरम्यान हरिदासचे मेंढा येथे येणे-जाणे सुरु होते. गुरूवारी ११ सप्टेंबरला मुलाला घेवून ते ब्रšापुरीला डॉक्टरकडे गेले होते. संध्याकाळी परत आल्यानंतर दोघांनी मिळून जेवण केले. त्यानंतर टीव्हीसुद्धा पाहिला. पण हरिदासच्या मनात काय दडले आहे, याची कल्पना त्याने कोणासही येवून दिली नाही. रात्री घरचे सर्व लोक झोपी गेल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान हरिदासने पत्नी वंदनावर कुर्‍हाडीने घाव घातले. वंदनाच्या किंचाळण्याने वंदनाची आई जागी झाली. तोवर हरिदास पसार झाला होता. वंदनाला लगेच उपचारासाठी ब्रšापुरी येथे नेण्यात आले. ब्रšापुरीच्या डॉक्टरांनी नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. नागपूरला नेत असताना रस्त्यातच वंदनाचा मृत्यू झाला. वंदनाच्या आईने गुरुवारी सकाळी पोलिसात फिर्याद दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wife's blood over suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.