ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - वॉट्स अॅप, व्हायबर, स्काईप, हाईक या सारख्या अॅप्ससाठी भविष्यात शुल्क द्यावे लागणार नसून टेलिकॉम रेग्युलेटर ऑथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाईल ऑपरेटर्सचा प्रस्ताव धुडकवून लावला आहे. या अॅप्समुळे एसएमएस आणि कॉल्स कमी होत असले इंटरनेट डाटा सर्व्हिसच्या माध्यमातून मोबाईल ऑपरेटर्स त्यांचे नुकसान भरुन काढण्यास सक्षम असल्याचे ट्रायने म्हटले आहे
गेल्या काही वर्षांमध्ये वॉट्स अॅप, व्हायबर, स्काईप, हाईक अशा अॅप्सचे प्रमाण वाढत असून या अॅप्समुळे फुकट मेसेज आणि व्हॉईस कॉलिंग करणे शक्य झाले आहे. या अॅप्समुळे मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना एसएमएस आणि कॉल्सद्वारे येणारे उत्पन्न घटत होते. फ्रि मेसेंजर सर्व्हिसेस आणि फ्रि इंटरनेट व्हाईस कॉलिंगमुळे दरवर्षी पाच हजार कोटींचे नुकसान होते असा दावा या कंपन्यांनी केला होता. त्यामुळे या अॅपवर शुल्क आकारावे असा प्रस्ताव सर्व मोबाईल सर्व्हिस ऑपरेटर कंपन्यांनी ट्रायकडे दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर हे अॅप्स वापरण्यासाठी युझर्सना पैसे मोजावे लागले असते. ट्रायने हा प्रस्ताव धुडकावून लावल्याने मोबाईल युझर्सवर अॅप्ससाठी पैसे मोजावे लागणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
टेलिकॉम विश्वातील एक तृतीयांशी उत्पन्न हे डाटा सर्व्हिसेसच्या माध्यमातून येत आहे. आगामी काळात हे प्रमाण वाढण्याची शक्यताही ट्रायच्या एका अधिका-याने वर्तवली आहे. त्यामुळे अशा अॅप्सवर शुल्क आकारण्यासंदर्भातील विचारमिनीमय करण्याचाही प्रस्तावही आम्ही स्वीकारणार नाही असे या अधिका-याने सांगितले.