मुंबई : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जापोटी जे प्राधान्य तसेच अनुदान दिले जाते, त्याची नेमकी गरज काय? असा थेट सवाल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केला आहे. परदेशात शिक्षण घेतलेल्या आणि अनेक वर्ष परदेशात वास्तव्य केलेल्या राजन यांच्या या भुमिकेमुळे आगामी काळात नवा वाद छेडला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात येथे झालेल्या बँकिंग परिषदेच्या दरम्यान बोलताना राजन यांनी देशात प्राधान्यक्रमाद्वारे होणाऱ्या कर्ज वितरणावर विस्तृत भाष्य करताना प्राधान्यक्रमाच्या यादीतील ‘प्राधान्य’ ठरविण्याची भूमिका मांडताना, परदेशी शिक्षणासाठी होणाऱ्या कर्ज वितरणाबाबत आपले मत व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या खरंच गरजू असतात का ? या विद्यार्थ्यांना कर्ज देणे चुकीचे नाही पण, त्यांना प्राधान्य क्रमांतर्गत वित्त पुरवठा होणे गरजेचे आहे का ?, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे राजन म्हणाले होते.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे उपलब्ध माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०१४ रोज शैक्षणिक कर्जापोटी (देशांतर्गत व परदेशात) झालेल्या कर्ज वितरणाची आकडेवारी ५७९० कोटी रुपये इतकी आहे.
(प्रतिनिधी)
परदेशी शिक्षणासाठी अनुदानाची गरज काय?
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जापोटी जे प्राधान्य तसेच अनुदान दिले जाते, त्याची नेमकी गरज काय
By admin | Updated: September 22, 2014 03:37 IST2014-09-22T03:37:58+5:302014-09-22T03:37:58+5:30
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जापोटी जे प्राधान्य तसेच अनुदान दिले जाते, त्याची नेमकी गरज काय
