Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्योगांना पाणीबंदी-पान १

उद्योगांना पाणीबंदी-पान १

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:19+5:302015-09-01T21:38:19+5:30

Waterproofing industries | उद्योगांना पाणीबंदी-पान १

उद्योगांना पाणीबंदी-पान १

>उद्योगांना पाणीबंदी!
-दुष्काळी भागासाठी निर्णय: पाणी साठे महसूलच्या ताब्यात
अतुल कुलकर्णी
मुंबई - दुष्काळाचे संकट ओढावलेल्या भागातील जनतेला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विदर्भ, कोकण आणि नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात उद्योगांना पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय सकारने घेतला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. शिवाय, पुढील पावसाळ्यापर्यंत राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्यावर महसूल विभागाचा ताबा राहील. त्या पाण्याचा वापर जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.
मराठवाडा, पि›म महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे. राज्यात आजपर्यंत ५३० मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ५६.६ टक्के आहे. तर राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये फक्त ४९ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक आहे.
२१७१ दलघमी क्षमतेच्या जायकवाडीत आज फक्त ४ टक्के पाणी शिल्लक आहे. तर पुर्णा-यलदरीत ३ टक्के, सिध्देश्वर, माजलगाव, मांजरा, तेरणा येथे शुन्य टक्के तर नांदेडच्या उर्ध्व पैनगंगामध्ये २३४ दलघमी पाणी साठा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत टंचाईग्रस्त भागातील पाणी उद्योगांना दिले जाणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.
.....................
या उद्योगांवर होईल परिणाम
मराठवाड्यात औषधी निर्माण, डिस्टीलरी आणि ब्रेव्हरीज अशा तीन प्रकारच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. मात्र पाणीच शिल्लक नसल्याने या उद्योगांवर परिणाम होईल, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषणकुमार गगराणी यांनी सांगितले. चाकण औद्योगिक वसाहतीत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज् असल्याने तेथे तुलनेने कमी पाणी लागते. पण तेथे देखील वेळ पडल्यास पिण्यासाठी प्राधान्य द्यावे लागेल, असेही गगराणी यांनी सांगितले.
..............................
मृत साठ्यावर तहान!
जलसंपदा विभागाचे लाभक्षेत्र विकास सचिव शि. मा. उपासे यांनी सांगितले की, रांजणगाव एमआयडीसीला घोड धरणातून पाणीपुरवठा होतो पण त्या ठिकाणी शुन्य टक्के पाणी आहे. तर उजनी धरणात आजच उणे ८.५ टक्के पाणीसाठा आहे. उजनीचे क्षेत्र मोठे आहे. त्या धरणातील मृत पाणी साठा देखील ६४ टीएमसी एवढा होतो, हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरायचे ठरवले तर किमान २ वर्षे पुरेल. परतीचा पाऊस मध्य महाराष्ट्रात पडतो असा आजवरचा अनुभव असल्याने आम्ही आशावादी आहोत असेही ते म्हणाले.
..................................
तिजोरी रिकामी करू-मुख्यमंत्री
दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारपासून तीन दिवसांच्या दौर्‍यावर असून आज त्यांनी लातूर जिल्‘ातील काही गावांना भेटी देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. गरज पडली तर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याची तिजोरी रिकामी करू, असे आश्वासन त्यांनी यावेयी दिले

Web Title: Waterproofing industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.