Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंजवडी गावाला पाण्याचा टँकर

मुंजवडी गावाला पाण्याचा टँकर

खळद : दर वर्षी उन्हाळा आला, की मुंजवडी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा वेळी मागील वर्षी सासवड येथील श्री भैरवनाथ ट्रस्टचे माजी अध्यक्ष गंगाधर ऊर्फ आण्णा बंडोबा जगताप यांनी उन्हाळ्यात गावाला टँकर सुरू केला होता. पण, या वर्षी ते हयात नसल्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे चिंरजीव शेती उद्योगचे मालक विलासकाका जगताप यांनी वडिलांच्या स्मरणार्थ सलग दुसर्‍या वर्षी हा उपक्रम सुरू ठेवून वडिलांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला.

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

खळद : दर वर्षी उन्हाळा आला, की मुंजवडी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा वेळी मागील वर्षी सासवड येथील श्री भैरवनाथ ट्रस्टचे माजी अध्यक्ष गंगाधर ऊर्फ आण्णा बंडोबा जगताप यांनी उन्हाळ्यात गावाला टँकर सुरू केला होता. पण, या वर्षी ते हयात नसल्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे चिंरजीव शेती उद्योगचे मालक विलासकाका जगताप यांनी वडिलांच्या स्मरणार्थ सलग दुसर्‍या वर्षी हा उपक्रम सुरू ठेवून वडिलांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला.

Water tanker in Munjawadi village | मुंजवडी गावाला पाण्याचा टँकर

मुंजवडी गावाला पाण्याचा टँकर

द : दर वर्षी उन्हाळा आला, की मुंजवडी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा वेळी मागील वर्षी सासवड येथील श्री भैरवनाथ ट्रस्टचे माजी अध्यक्ष गंगाधर ऊर्फ आण्णा बंडोबा जगताप यांनी उन्हाळ्यात गावाला टँकर सुरू केला होता. पण, या वर्षी ते हयात नसल्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे चिंरजीव शेती उद्योगचे मालक विलासकाका जगताप यांनी वडिलांच्या स्मरणार्थ सलग दुसर्‍या वर्षी हा उपक्रम सुरू ठेवून वडिलांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमाची सुरुवात दत्ता झुरंगे यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षकनेते संदीप जगताप हे होते. या वेळी एखतपूर-मुंजवडीच्या सरपंच दीपाली टिळेकर, माजी सरपंच महादेव टिळेकर, ग्रामपंचायत सदस्या राणी झुरंगे, आशा निंबाळकर, लक्ष्मी धिवार, काळूराम धिवार तसेच किसन टिळेकर, बाळासाहेब झुरंगे, नंदू झुरंगे, दीपक धिवार, राजेंद्र जगताप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंजवडी गावासाठी असणारी पाणीपुरवठा योजना गेले २ महिने बंद आहे. शासनाकडे पाणी टँकरसाठी प्रस्ताव दाखल केला आहे; पण अजून तो मंजूर झालेला नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. अशा वेळी विलास जगताप यांची मदत ही खूप मोलाची असून आता त्यांच्यामुळे येथे रोज १० हजार लिटरचा एक टँकर पाणीपुरवठा केला जात आहे. हा टँकर यापुढे दोन महिने दिला जाणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी दिली.

फोटो ओळी:- मुंजवडी (ता. पुरंदर) येथे गंगाधर जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टँकर सुरु करण्यात आला. या वेळी दत्ता झुरंगे, संदीप जगताप व इतर.
०००

Web Title: Water tanker in Munjawadi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.