Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिल्?ात आजही 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्?ात आजही 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा

माढय़ात सर्वाधिक टँकर: जिल्?ात टँकरच्या प्रतिदिन 400 खेपा

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:30+5:302014-08-25T21:40:30+5:30

माढय़ात सर्वाधिक टँकर: जिल्?ात टँकरच्या प्रतिदिन 400 खेपा

Water supply through 180 tankers still in the district | जिल्?ात आजही 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्?ात आजही 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा

ढय़ात सर्वाधिक टँकर: जिल्?ात टँकरच्या प्रतिदिन 400 खेपा
सोलापूर: जिल्?ात बहुतांश तालुक्यात चांगला पाऊस पडला असला तरीही पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू आह़े जिल्?ात आजही 180 टँकरद्वारे 172 गावे आणि 691 वाड्यावस्त्यांमधील साडेतीन लाख लोकांना पाणीपुरवठा केला जात आह़े
जिल्?ातील 11 तालुक्यात अक्कलकोट वगळता सर्वत्र पाणी टँकर सुरू आहेत़ माढा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 45 टँकर आहेत़ या टँकरद्वारे 24 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार सुमारे 373 खेपा केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आह़े सुरू असलेल्या टँकरमध्ये 12 टँकर हे शासकीय असून उर्वरित 168 टँकर खासगी आहेत़ गेल्या महिन्यात ही टँकर संख्या 200 वर पोहोचली होती मात्र काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्यामुळे सुमारे 25 टँकर घटले आहेत़ पावसाने बरीच दिवस ओढ दिल्यामुळे जमिनीतील पाणी पातळी खाली गेली आहे त्यामुळे जरी पाऊस चांगला पडला असला तरीही पाणीपातळी वाढली नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कायम आह़े
इन्फो बॉक्स ़़़
टँकरची संख्या
-सांगोला-17
-मंगळवेढा-31
-माढा-45
-करमाळा-33
-माळशिरस-9
-मोहोळ-15
-द़सोलापूर-13
-उ़सोलापूर-7
-बार्शी-7
-पंढरपूर-3

Web Title: Water supply through 180 tankers still in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.