Lokmat Money > बिझनेस न्यूज > महान धरणाची जलपातळी वाढली

महान धरणाची जलपातळी वाढली

महान : संपूर्ण अकोला शहराची तहान भागविणार्‍या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. पानलोट क्षेत्रात ७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसामुळे महान धरणाच्या पातळीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी धरणातील जलपातळी ११२४.४४ फूट एवढी होती. धरणात २९,८६५ दलघमी जलसाठा असून, हा जलसाठा ३४.५८ टक्के एवढा आहे. अकोला शहरास किमान वर्षभर पुरेल एवढा हा जलसाठा असल्याने अकोला शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली आहे. अकोला शहरासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता धरणात पाच व्हॉल्व असून, त्यापैकी चार व्हॉल्व पाण्याखाली आले आहेत. आता केवळ एकच व्हॉल्व उघडा असून, जलपातळीत अशीच वाढ होत राहिली, तर तो लवकरच पाण्याखाली येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. धरणात ५० टक्के जलसाठा झाल्यास नदी काठावरील ५४ खेड्यातील लोकांना

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:35+5:302014-09-11T22:30:35+5:30

महान : संपूर्ण अकोला शहराची तहान भागविणार्‍या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. पानलोट क्षेत्रात ७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसामुळे महान धरणाच्या पातळीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी धरणातील जलपातळी ११२४.४४ फूट एवढी होती. धरणात २९,८६५ दलघमी जलसाठा असून, हा जलसाठा ३४.५८ टक्के एवढा आहे. अकोला शहरास किमान वर्षभर पुरेल एवढा हा जलसाठा असल्याने अकोला शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली आहे. अकोला शहरासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता धरणात पाच व्हॉल्व असून, त्यापैकी चार व्हॉल्व पाण्याखाली आले आहेत. आता केवळ एकच व्हॉल्व उघडा असून, जलपातळीत अशीच वाढ होत राहिली, तर तो लवकरच पाण्याखाली येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. धरणात ५० टक्के जलसाठा झाल्यास नदी काठावरील ५४ खेड्यातील लोकांना

The water reservoir of the Great Dam has increased | महान धरणाची जलपातळी वाढली

महान धरणाची जलपातळी वाढली

ान : संपूर्ण अकोला शहराची तहान भागविणार्‍या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. पानलोट क्षेत्रात ७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसामुळे महान धरणाच्या पातळीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी धरणातील जलपातळी ११२४.४४ फूट एवढी होती. धरणात २९,८६५ दलघमी जलसाठा असून, हा जलसाठा ३४.५८ टक्के एवढा आहे. अकोला शहरास किमान वर्षभर पुरेल एवढा हा जलसाठा असल्याने अकोला शहरवासीयांची वर्षभराची चिंता मिटली आहे. अकोला शहरासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता धरणात पाच व्हॉल्व असून, त्यापैकी चार व्हॉल्व पाण्याखाली आले आहेत. आता केवळ एकच व्हॉल्व उघडा असून, जलपातळीत अशीच वाढ होत राहिली, तर तो लवकरच पाण्याखाली येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. धरणात ५० टक्के जलसाठा झाल्यास नदी काठावरील ५४ खेड्यातील लोकांना पिण्यासाठी व नदी काठावरील परवानाधारक शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकते. धरणातील जलपातळीवर उपविभागीय अभियंता सोळंके, शाखा अभियंता तेजनकर, सुधाकर जानोरकर, पिंपळकर, मनोज पाठक हे लक्ष ठेवून आहेत.(वार्ताहर)11सीटसीएल04

Web Title: The water reservoir of the Great Dam has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.