Lokmat Money > बिझनेस न्यूज > जलवाहिन्यांना गळती; पाण्याची नासाडी कंत्राटदारांचे हात वर

जलवाहिन्यांना गळती; पाण्याची नासाडी कंत्राटदारांचे हात वर

अकोला : महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र आहे. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मागील दोन महिन्यांपासून जलवाहिनी दुरुस्तीचे कार्यादेश मंजूर न केल्याने कंत्राटदारांनी हात वर केले आहेत. यामुळे गळती लागलेल्या जलवाहिन्यांमधून दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसत आहे.

By admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:14+5:302014-10-24T23:12:14+5:30

अकोला : महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र आहे. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मागील दोन महिन्यांपासून जलवाहिनी दुरुस्तीचे कार्यादेश मंजूर न केल्याने कंत्राटदारांनी हात वर केले आहेत. यामुळे गळती लागलेल्या जलवाहिन्यांमधून दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसत आहे.

Water leakage; Debris of waste water on the contractors' hands | जलवाहिन्यांना गळती; पाण्याची नासाडी कंत्राटदारांचे हात वर

जलवाहिन्यांना गळती; पाण्याची नासाडी कंत्राटदारांचे हात वर

ोला : महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र आहे. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मागील दोन महिन्यांपासून जलवाहिनी दुरुस्तीचे कार्यादेश मंजूर न केल्याने कंत्राटदारांनी हात वर केले आहेत. यामुळे गळती लागलेल्या जलवाहिन्यांमधून दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसत आहे.
अकोलेकरांना पाणी बचतीचा मूलमंत्र देणार्‍या मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जलवाहिन्यांमधून दररोज लाखो लीटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. प्रत्येक दिवशी ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो, त्या भागातील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वैतागलेल्या अकोलेकरांना साचलेल्या पाण्याचा दुहेरी सामना करावा लागत आहे. प्रशासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता, अकोलेकरांच्या हिताचा आव आणणार्‍या प्रशासनाचा खरा चेहरा उघड होत असल्याचा सूर उमटू लागला आहे. मनपाच्या जलप्रदाय विभागामार्फत जलवाहिन्या दुरुस्तीची कामे करणार्‍या कंत्राटदारांची देयके जाणीवपूर्वक थकीत ठेवण्यात आली. देयके थकीत असल्यामुळे कंत्राटदारांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवाय दोन महिन्यांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीच्या निविदा प्रकाशित केल्या असता, संबंधित कंत्राटदारांना अद्यापही कार्यादेश (वर्कऑर्डर) देण्यात आले नाहीत. ठोस निर्णय क्षमतेच्या अभावी प्रशासन वर्कआर्डरला मंजुरी देत नसल्याची कुणकुण महापालिकेत सुरू झाली आहे.

बॉक्स...
कंत्राटदारांच्या तोंडाला पुसली पाने
थकीत देयके अदा करण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. निवेदन दिल्यावरही प्रशासन निर्णय घेत नसल्याचे पाहून कंत्राटदारांनी २० ऑक्टोबरपासून मनपासमोर बेमुदत उपोषण छेडले. त्यानंतर झोपेतून जागे झालेल्या प्रशासनाने कंत्राटदारांची अत्यल्प किमतीची देयके अदा केली. हा प्रकार म्हणजे कंत्राटदारांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखा असल्यामुळे की काय, त्यांनी काम करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

बॉक्स...
अधिकारी हतबल
गळती लागलेल्या जलवाहिन्यांमधून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. कंत्राटदारांना सूचना केल्यास थकीत देयकाची सबब पुढे करीत जलप्रदाय विभागातील अधिकार्‍यांना टोलवल्या जात असल्याची दयनीय परिस्थिती आहे.

Web Title: Water leakage; Debris of waste water on the contractors' hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.