Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाळूज..६

वाळूज..६

वळदगावात धूरफवारणी

By admin | Updated: August 3, 2014 00:55 IST2014-08-01T22:30:54+5:302014-08-03T00:55:02+5:30

वळदगावात धूरफवारणी

Walnage.6 | वाळूज..६

वाळूज..६

वळदगावात धूरफवारणी
वाळूज महानगर : दुर्गंधीमुळे साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. साथीच्या रोगाला आळा बसावा यासाठी ग्रामपंचायत व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी वळदगाव येथे डास निर्मूलनासाठी धूरफवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच सखूबाई चुंगडे, पं. स. सदस्य गणेश नवले, ग्रामसेवक एन. एल. रावते, कैलास चुंगडे, सुभाष साबळे, कांतराव नवले, जनार्दन झळके, नारायण डांगर, संजय लांडगे, लीलाबाई खोतकर, राधाकिशन नवले, विष्णू झळके, रमेश म्हस्के, राजू मुसळे, रितेश पाहडिये, मुसा पठाण यांची उपस्थिती होती.
-------
टँकरचा पाणीपुरवठा बंद करू नये
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांना जोपर्यंत कायमस्वरूपी पाणी मिळत नाही, तोपर्यंत सुरू असलेला टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष एस. बी. बनकर, आनंदा साळवे, अशोक पवार, मधुकर रणनवरे, विकास साळवे, भीमराव पगारे, शामराव जाधव, दिलीप मगर, किशोर मगर, ताराबाई बनकर, मीना पवार, मंजूबाई देहाडे, सुनीता भालेराव, छाया जोगदंड, गया जाधव आदींनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
--------
वाळूजच्या आठवडी बाजारातून दुचाकी पळविली
वाळूज महानगर : वाळूज येथील आठवडी बाजारात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना ७ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, गणेश सखाराम पवार (रा. गणेश वसाहत, वाळूज) हे आपली दुचकी (क्रमांक एमएच-२१, एए-४६५०) आठवडी बाजारात उभी करून बाजार खरेदीसाठी गेले होते. पवार बाजार खरेदी करून दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले असता, दुचाकी चोरट्यांनी पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकीचा शोध घेतला असता कोठेच दुचाकी आढळून आली नाही. अखेर पवार यांनी आज १ ऑगस्ट रोजी वाळूज पोलीस ठाणे जाऊन दुचाकी चोरीला गेल्याची तक्र ार दिली. पवार यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. बी. आर. जायभाय हे करीत आहेत.
---
फक्त फोटो आहे....
फोटो ओळ -
नागपंचमीनिमित्त बजाजनगरातील महिलांनी नागराजाचे आश्रयस्थान असलेल्या वारुळाची मनोभावे पूजा करून उपवास धरला होता. बजाजनगरातील रामलीला मैदानावर असलेल्या वारुळाची पूजा करताना महिला दिसत आहेत. (छाया : आतिश वानखेडे)
फोटो क्रमांक - नागपंचमी १/ २

Web Title: Walnage.6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.