जिनिव्हा : जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरात यंदा सुधार दिसणार नाही, असे नमूद करत संयुक्त राष्ट्र संघाने कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचे आवाहन केले आहे. मागणी व गुंतवणूक वृद्धीकरिता वेतनवाढ आवश्यक आहे.
संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषद अर्थात अंक्टाडने इशारा दिला की, आर्थिक मंदीच्या सहा वर्षांनंतरही जागतिक अर्थव्यवस्था बळकटीच्या दिशेने जात नाही. जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर यंदा २.५ ते ३.० टक्क्यांदरम्यान राहील. २०१२ व २०१३ मध्ये वृद्धीदर २.३ टक्क्यांहून अधिक होता, असे अंक्टाडच्या व्यापार व विकास अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, विकसनशील देशांत वृद्धीदर यंदा ४.७ टक्के एवढा राहण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी अर्थव्यवस्था वाढीचा दर ४.६ टक्क्यांहून अधिक राहिला. तिकडे विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर १.८ टक्क्यांवर राहील. गेल्यावर्षी तो १.३ टक्के होता. (वृत्तसंस्था)
अर्थव्यवस्था वाढीसाठी वेतनवाढ हवी -युनो
जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरात यंदा सुधार दिसणार नाही, असे नमूद करत संयुक्त राष्ट्र संघाने कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचे आवाहन केले आहे
By admin | Updated: September 13, 2014 05:07 IST2014-09-13T05:07:29+5:302014-09-13T05:07:29+5:30
जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरात यंदा सुधार दिसणार नाही, असे नमूद करत संयुक्त राष्ट्र संघाने कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचे आवाहन केले आहे
