Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विठ्ठलाला दीड कोटींच्या देणग्या

विठ्ठलाला दीड कोटींच्या देणग्या

पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे

By admin | Updated: August 3, 2015 01:00 IST2015-08-03T01:00:57+5:302015-08-03T01:00:57+5:30

पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे

Vitthalala donates Rs.1.5 crores | विठ्ठलाला दीड कोटींच्या देणग्या

विठ्ठलाला दीड कोटींच्या देणग्या

सचिन कांबळे / सुनील शिवशरण, पंढरपूर
पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी आषाढीच्या कालावधीत दक्षिणापेटीत ३९ लाख ८ हजार १७ रुपये, तर देणगीद्वारे १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले.
यंदा १२ लाख भाविकांनी आषाढीला पंढरीत हजेरी लावली. आषाढी यात्रेत आलेल्या भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर ३२ लाख ६७ हजार ६३६ रुपयांचे तर रुक्मिणी माते चरणी ६ लाख ४० हजार ३८१ रुपयांचे दान अर्पण केले.अन्नछत्रासाठी ८३ हजार तर विठ्ठल-रुक्मिणीला १ कोटी २० लाख ९८ हजार ७८८ देणगी दिली आहे. विक्रीतून समितीला ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
विठ्ठल-रुक्मिणीला दान व देणगीतून १ कोटी ६० लाख ६ हजार ८०५ रुपये व प्रसाद व वस्तूंच्या विक्रीतून ६१ लाख ८० हजार ७२० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी मंदिर समितीला २ कोटी २१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Web Title: Vitthalala donates Rs.1.5 crores