Lokmat Money > बिझनेस न्यूज > विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक घडतात : चंचल पाटील (बातमीसाठी फोटो)

विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक घडतात : चंचल पाटील (बातमीसाठी फोटो)

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

Visionary scientists come from science exhibition: Chanchal Patil (photo for news) | विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक घडतात : चंचल पाटील (बातमीसाठी फोटो)

विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक घडतात : चंचल पाटील (बातमीसाठी फोटो)

डोली : कोडाली (ता. पन्हाळा) येथे जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जनावरांच्या दवाखान्यात इमारतीचे उद्घाटन अद्याप न झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांची कुचंबणा होत आहे.
कोडोलीत जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांचा दवाखाना पूर्वीपासून कार्यरत होता. या दवाखान्यात उपलब्ध सोयीसुविधांची कमतरता आणि उपचारासाठी येणार्‍या जनावरांची संख्या मोठी असल्याने शासनाने नव्याने सर्व सोयीनियुक्त जनावरांचा दवाखाना उभारण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. अत्याधुनिक इमारतीबरोबरच जनावरांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या सोयीसुविधा तयार करणे गरजेचे आहे; परंतु याठिकाणी इतर सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. यामुळे इमारत बांधण्यासाठी गंतुवलेले कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरीवर्गाला जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे या परिसरात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकर्‍यांच्या जनावरांबरोबर इतर पाळीव प्राण्यांची संख्याही परिसरात मोठ्या प्रमाणात आहे.
पशुवैद्यकीय विभागामार्फत उभारण्यात आलेला दवाखाना इमारतीचे उद्घाटन प्रतीक्षेत असल्याने कोडोलीसह परिसरातील शेतकरी व इतर लोकांची मोठी कुचंबणा होत आहे. सध्या शासकीय दवाखाना बंद स्थितीत असल्याने खासगी डॉक्टरांमार्फत जनावरांवर उपचार करून घेण्याची वेळ लोकांवर आली आहे.
मनसे कोडोली शहर व भ्रष्टाचार निर्मूलन समिती, पन्हाळा तालुकाच्या कार्यकर्त्यांनी या कामाबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाही. तरी लवकरात लवकर सर्व सोयीनियुक्त दवाखाना सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे कोडोली शहराध्यक्ष नयन गायकवाड व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रमेश येनकर व इतर पदाधिकार्‍यांनी दिला आहे.
-----------
फोटो ओळ :
कोडोली (ता. पन्हाळा) येथील बंद स्थितीत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत.

Web Title: Visionary scientists come from science exhibition: Chanchal Patil (photo for news)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.