Lokmat Money > बिझनेस न्यूज > हरितगृह शेतीकडे विदर्भातील शेतकऱ्यांचा कल!

हरितगृह शेतीकडे विदर्भातील शेतकऱ्यांचा कल!

‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉलीहाऊस-शेडनेट उभारणीकडे त्यांचा कल वाढला आहे.

By admin | Updated: April 3, 2015 00:07 IST2015-04-03T00:07:59+5:302015-04-03T00:07:59+5:30

‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉलीहाऊस-शेडनेट उभारणीकडे त्यांचा कल वाढला आहे.

Vidarbha farmer's trend in greenhouse farming! | हरितगृह शेतीकडे विदर्भातील शेतकऱ्यांचा कल!

हरितगृह शेतीकडे विदर्भातील शेतकऱ्यांचा कल!

अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉलीहाऊस-शेडनेट उभारणीकडे त्यांचा कल वाढला आहे. जगातील सर्वच नामवंत बियाणे कंपन्या बुलडाणा जिल्ह्णातील देऊळगावराजा येथे शेडनेटमधून बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेत असल्याने या गावाचे नाव आंतराराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.
देशात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्णातील देऊळगावराजा या दोनच ठिकाणी भाजीपाला, मिरची व वेलवर्गीय भाज्यांच्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम शेडनेट, पॉलीहाऊसमधून घेण्यात येत आहे. सुरुवातीला कर्नाटकातील राणी बिन्नोर येथेच शेडनेटमध्ये बीजोत्पादन घेतले जात होते.
तथापि, देऊळगावराजा येथील शेतकऱ्यांनी या बिजोत्पादन कार्यक्रमाचे नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यानंतर शेडनेटमध्ये बिजोत्पादन घेणारे देऊळगावराजा हे देशातील दुसरे केंद्र बनले. या भागात संकरित टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वेलवर्गीय भाजीपाला, काकडी आदी सर्वच प्रकारच्या भाजीपाला पिकांचे बिजोत्पादन केले जाते. या भागातील वातावरण बिजोत्पादनासाठी पोषक असल्याने या क्षेत्रामध्ये कार्यरत जगातील बहुतांश कंपन्यांनी देऊळगावराजात पाय रोवले आहेत. या शेतकऱ्यांना दहा गुंठा क्षेत्रात बिजोत्पादन घेण्यासाठी दोन लाख रुपये मिळत असल्याने या भागात शेडनेट शेतीचा चांगलाच विस्तार झाला आहे.
बिजोत्पादनाचे काम कौशल्यआधारित असल्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची गरज भासते. सध्या राज्यात पुणे येथे शेतकऱ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही सोय प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामार्फत केल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.
शेडनेट शेतीसाठी शासनाकडून पूरक अनुदानाची गरज शेतकऱ्यांनी अधोरेखित केली आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुुदानात मजबूत शेडनेट घालता येत नाही. दुसरीकडे ज्या कंपन्या येथे बिजोत्पादन घेतात, त्या शेडनेट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला ५० हजारांपर्यंत रक्कम उपलब्ध करतात. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha farmer's trend in greenhouse farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.