ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या दणदणीत यशाचा परिणाम मंगळवारी शेअर मार्केटवर पाहायला मिळला. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने उत्तरप्रदेशात 325 जागा जिंकत जबरदस्त विजय मिळवल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि निफ्टीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत 9100 चा आकडा पार केला. निवडणूक निकाल आणि होळीनंतर मंगळवारी शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 500 आणि 150 अंकांची झाल्याचं दिसलं.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात तर सर्वोच्च पातळी गाठत, 600 अंकांचा टप्पा गाठला, निफ्टीमध्ये आता 125 ते 130 च्या आसपास वाढ आहे. तर मुंबई शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 450 ते 500 अंकांची वाढ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रुपयाही वर्षभरातील मजबूत स्थितीत आला असून डॉलरच्या तुलनेत 42 पैशांनी वाढला आहे. रुपयाही गेल्या वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर आला आहे.
Rupee climbs 42 paise to 66.18 against dollar in opening trade after BJP's #election victory.
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2017
#Nifty hits new high at 9,122.75 in opening trade, #Sensex soars 616 points to 29,561.93 on BJP's massive win in UP.
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2017
सेन्सेक्सने 500 अंकांची वाढ घेतल्याने 29460 वर पोहोचला असताना दुसरीकडे निफ्टीदेखील 155 अकांनी वाढला आणि 9090 वर पोहोचला. थोड्याच वेळात निफ्टीने गतवर्षीचा 9119.20 अंकाचा रेकॉर्डही तोडला. 4 मार्च 2015 ला हा रेकॉर्ड झाला होता. अपेक्षेप्रमाणे रुपयाही डॉलरच्या तुलनेत मजबूत स्थितीत गेला आणि 66.60 वरुन 66.20 वर पोहोचला.
ऐडलवेसिस सेक्युरिटीजने सांगितलं आहे की, 'बाजारासाठी मोदींचा हा विजय या गोष्टीचा संकेत आहे की, 2019 मध्ये देखील मोदी पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येऊ शकतात. तसंच उत्तरप्रदेशातील आपल्या विजयामुळे मोदी आपल्या विकासाच्या अजेंडावर कायम राहतील. भाजपाची राज्यसभेतील परिस्थिती सुधरेल आणि त्यामुळे बिल पास करणं सोपं जाईल'.