मुंबई : वाहन आणि आरोग्य विमा १ एप्रिलपासून महागणार आहे. या विम्याच्या प्रिमियममध्ये पाच टक्के वाढ होऊ शकते. विमा एजंटच्या कमिशनबाबतचा कायदा १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटले आहे की, विमा कंपन्या या माध्यमातून आपल्या उत्पादनाच्या किंमतीची समीक्षा करु शकतात. विम्याचा प्रिमियम सद्याच्या प्रिमियच्या ५ टक्के कमी अथवा जास्त करण्याची परवानगी यात आहे.
या निर्णयामुळे विमा एजंटांचे कमिशन वाढू शकते. याशिवाय चांगले काम केल्यास त्यांना कंपनीकडून वेगळे बक्षिसही
मिळू शकते. विमा विनियामक
आणि विकास प्राधिकरणाने म्हटले आहे की, विमा कंपन्यांना असे सर्टिफिकीट द्यावे लागेल की, जी पॉलिसी अगोदर विकली गेली आहे. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वाहन, आरोग्य विमा महागणार
वाहन आणि आरोग्य विमा १ एप्रिलपासून महागणार आहे. या विम्याच्या प्रिमियममध्ये पाच टक्के वाढ होऊ शकते.
By admin | Updated: March 27, 2017 00:46 IST2017-03-27T00:46:30+5:302017-03-27T00:46:30+5:30
वाहन आणि आरोग्य विमा १ एप्रिलपासून महागणार आहे. या विम्याच्या प्रिमियममध्ये पाच टक्के वाढ होऊ शकते.
