Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाजीपाला ...१ ...

भाजीपाला ...१ ...

By admin | Updated: July 19, 2015 21:34 IST2015-07-19T21:34:59+5:302015-07-19T21:34:59+5:30

Vegetable ... 1 ... | भाजीपाला ...१ ...

भाजीपाला ...१ ...

>संबंधित फोटो ...

कोथिंबीर, मिरची @ ८०!
- भाज्यांची आवक वाढली : बटाटे स्वस्त, कांदे महाग

नागपूर : पावसाने दडी मारल्यानंतरही भाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. स्थानिकांकडून आवक वाढली असून काही भाज्या आटोक्यात तर बहुतांश भाज्यांचे भाव आटोक्याबाहेर आहेत. टमाटर व फुलकोबीने ४० रुपयांचा टप्पा पार केला आहे. महागाईने आधीच संकटात असलेल्या मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट वाढले आहे.
किरकोळमध्ये भाज्या महाग
कॉटन मार्केटमध्ये नागपूर जिल्हा आणि अन्य राज्यातून भाज्यांची आवक आहे. वांगे, पालक, कोहळे, लवकी वगळता सर्वच भाज्या २५ ते ७० रुपयांदरम्यान आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशांवर ताण पडत आहे. कोथिंबीर आणि मिरची ७० ते ८० रुपयांवर पोहोचल्या आहेत. जुलै अखेरपर्यंत भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील, अशी स्थिती आहे. कोथिंबीर नांदेड, नाशिक, छिंदवाडा येथून तर हिरवी मिरची बुलडाणा, औरंगाबाद, मेरठ, हैदराबाद येथून विक्रीस येत आहे.
आवक वाढली, भाव वाढले
बाजारातील बहुतांश भाज्यांची गुणवत्ता निकृष्ट आहे. नागपूरलगतच्या २५ कि़मी. अंतरावरून पालक, वांगे, चवळी भाजी, मुळा, टमाटर कॉटन मार्केट बाजारात विक्रीस येत आहेत. सिंचनाची सोय असलेले उत्पादक शेतीला पर्याय म्हणून भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. मागणी जास्त असल्याने त्यांनी भाव वाढविले आहेत. बाजारात हिरव्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी भाजी ६० रुपये किलो आहे.
टोमॅटो व फुलकोबी ४० रुपये
मध्यंतरी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे पीक गेले. ज्यांना उत्पादन मिळाले त्यांनी भाव वाढविले आहेत. सध्या बेंगळुरू, नाशिक, संगमनेर आणि नागपूरलगतच्या भागातून टोमॅटोची आवक असल्याची माहिती कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली. नवीन माल ऑगस्ट महिन्यात येईल, तोपर्यंत ग्राहकांना वाढीव भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील. सध्या कॉटन मार्केट बाजारात दररोज १२० ते १२५ लहान-मोठ्या गाड्यांची आवक आहे.

Web Title: Vegetable ... 1 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.